|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.82° C

कमाल तापमान : 29.93° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 5.65 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.93° C

Weather Forecast for
Thursday, 25 Apr

28.23°C - 30.43°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

28.31°C - 30.09°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.23°C - 30.02°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.46°C - 30.97°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.17°C - 32.4°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.12°C - 32.23°C

few clouds

भारत कोणत्याही संकटावर भूमिका ठरवण्यास स्वतंत्र : व्हाईट हाऊस

भारत कोणत्याही संकटावर भूमिका ठरवण्यास स्वतंत्र : व्हाईट हाऊसवॉशिंग्टन, (१० नोव्हेंबर) – भारत हा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार आहे. मध्य पूर्वेसह जगभरातील कोणत्याही विशिष्ट संकटावर कींवा आकस्मिक परिस्थितीवर आपली भूमिका ठरवण्यास तो स्वतंत्र आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. व्हाईट हाऊसमधील नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधील स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समन्वयक जॉन किर्बी यांनी हे मत मांडले आहे. भारताचे इस्रायलशी चांगले संबंध असल्याने मध्य पूर्वेतील संकट सोडवण्यासाठी अमेरिका भारताच्या भूमिकेला कोणत्या दृष्टीने पाहते, या प्रश्नाला ते उत्तर देत होते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना...11 Nov 2023 / No Comment /

पाकिस्तानातील निष्पक्ष निवडणुकांवर लक्ष: अमेरिका

पाकिस्तानातील निष्पक्ष निवडणुकांवर लक्ष: अमेरिकावॉशिंग्टन, (०८ नोव्हेंबर) – पाकिस्तानात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत, असे अमेरिकेने म्हटले आहे. मुक्त वातावरणातील निवडणुकांचा त्या देशातील लोकांना फायदाच होणार असल्याचेही अमेरिकेने सांगितले. अनेक महिन्यांचा गोंधळ संपवून, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ईसीपी) या महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पेटल यांनी पाकिस्तानमधील आगामी निवडणुकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, पाकिस्तानी लोकांच्या हितासाठी मुक्त आणि...8 Nov 2023 / No Comment /

एलन मस्क यांचा फेसबुकचे नाव बदलण्याचा प्रस्ताव

एलन मस्क यांचा फेसबुकचे नाव बदलण्याचा प्रस्ताव– मस्क यांचा झुकरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव न्यू यॉर्क, (०४ नोव्हेंबर) – उद्योगपती एलन मस्क नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत आले आहेत. याआधी मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याचे नाव आणि आयकॉन बदलून एक्स केले. त्याबरोबरच ट्विटरवरील ब्ल्यू टिकसाठी पैसे घेणे सुरू केले. आता मस्क यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात फेसबुकचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती ‘द बेलीलॉन बी’ने यावर एक पोस्ट टाकून...4 Nov 2023 / No Comment /

न्यायाधीशांना घटनात्मक नैतिकतेने मार्गदर्शन केले जाते: सरन्यायाधीश

न्यायाधीशांना घटनात्मक नैतिकतेने मार्गदर्शन केले जाते: सरन्यायाधीशवॉशिंग्टन, (०४ नोव्हेंबर) – भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तुलना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाशी केली आहे आणि त्याला लोक न्यायालय म्हटले आहे. ते म्हणतात की अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय एका वर्षात सुमारे ८० प्रकरणे निकाली काढते, तर या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ७२,००० प्रकरणे निकाली काढली आहेत आणि लोकांची सेवा करण्याची आपली वचनबद्धता दर्शविली आहे. एचटी लीडरशिप समिट २०२३ च्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशीच्या सत्राला संबोधित करताना त्यांनी या गोष्टी...4 Nov 2023 / No Comment /

वॅगनर ग्रूप हिजबुल्लाला देणार हवाई संरक्षण यंत्रणा

वॅगनर ग्रूप हिजबुल्लाला देणार हवाई संरक्षण यंत्रणा– अमेरिकी गुप्तचर अहवालात दावा, वॉशिंग्टन, (०३ नोव्हेंबर) – रशियातील वॅगनर ग्रूप लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाला हवाई संरक्षण यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेल्या युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या विरोधात लढण्यासाठी हमास आणि हिजबुल्लाने हातमिळवणी केली असून, ते संयुक्तपणे हल्ले करणार असल्याचे सांगितले जाते. वॅगनर ग्रूप आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवर अमेरिकी अधिकारी नजर ठेवून असल्याचे...4 Nov 2023 / No Comment /

काही काळासाठी का होईना, युद्ध थांबवा: बायडेन

काही काळासाठी का होईना, युद्ध थांबवा: बायडेनवॉशिंग्टन, (०२ नोव्हेंबर) – पॅलेस्टाईनमधील मानवतावादी गरजा पूर्ण करण्यासाठी इस्रायल-हमास युद्धाला ’विराम’ देण्याची गरज आहे असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हंटले आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान एका निदर्शकाने युद्धविरामाची हाक दिल्यानंतर बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान हे सांगितले. बायडेन म्हणाले, ’मला वाटते की युद्ध थांबवण्याची गरज आहे, जरी काही काळासाठी का होईना.’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय व्हाईट हाऊसच्या शीर्ष सहाय्यकांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या वेळी...2 Nov 2023 / No Comment /

ट्रुडो यांच्यावर कॅनडाची प्रतिमा डागाळल्याचा ठपका

ट्रुडो यांच्यावर कॅनडाची प्रतिमा डागाळल्याचा ठपकाओटावा, (०२ नोव्हेंबर) – कॅनडामध्ये आजकाल काहीही चांगले चालले नाही. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि रणनीतींमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारतासोबतचा निज्जर वाद असो किंवा चीनशी संबंध असो किंवा देशातील कार्बन टॅक्सचा मुद्दा असो, सर्वच बाबतीत देशाची प्रतिमा डागाळल्याचा ठपका ट्रुडो यांच्यावर ठेवला जात आहे. देशातील बिघडलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या लिबरल पार्टीचे दिग्गज नेते आणि पंतप्रधानांचे माजी चीफ ऑफ स्टाफ पर्सी...2 Nov 2023 / No Comment /

संयुक्त राष्ट्रात ‘गाझा युद्धबंदी’ ठराव

संयुक्त राष्ट्रात ‘गाझा युद्धबंदी’ ठराव– मतदानात भारत अनुपस्थित; कारण केले स्पष्ट, न्यू यॉर्क, (२८ ऑक्टोबर) – इस्रायल-हमास युद्धाने संपूर्ण जगातील तणाव वाढला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत गाझा युद्धबंदीचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावरील मतदानात भारत अनुपस्थित राहिला तसेच त्याचे कारणही स्पष्ट केले. जॉर्डनने गाझा युद्धबंदीसंदर्भातील ठराव शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत सादर केला. या ठरावाला व्यापक समर्थन मिळाले. मात्र, हमासला दहशतवादी घोषित न केल्यामुळे अमेरिकेने तीव्र संताप व्यक्त तेला. या ठरावावेळी भारताने अलिप्त भूमिका घेतली...28 Oct 2023 / No Comment /

अशोक गाडगीळ, सुब्रा सुरेश या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार

अशोक गाडगीळ, सुब्रा सुरेश या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार– राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या हस्ते गौरव, वॉशिंग्टन, (२७ ऑक्टोबर) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मंगळवारी दोन भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ अशोक गाडगीळ आणि सुब्रा सुरेश यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित केले. व्हाईट हाऊसने सांगितले की, राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशाच्या भल्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषात अनुकरणीय कामगिरी केलेल्या अनेक अमेरिकन नागरिकांना ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ आणि ‘नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड इनोव्हेशन’ने सन्मानित केले. अशोक गाडगीळ...27 Oct 2023 / No Comment /

गुटारेस यांनी युनोच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा द्यावा

गुटारेस यांनी युनोच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा द्यावा– हमासची बाजू घेतल्याने भडकला इस्रायल, न्यू यॉर्क, (२५ ऑक्टोबर) – संयुक्त राष्ट्रसंघात इस्रायल-हमासच्या युद्धावर सुरू असलेल्या चर्चेत हमासची बाजू घेतल्याने भडकलेल्या इस्रायलने अँटोनियो गुटारेस यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. महिला, बालकांच्या हत्येबाबत सरचिटणीसांनी घेतलेली भूमिका संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वासाठी उपयुक्त नाही. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील इस्रायलचे राजदूत गिलाद एर्दान यांनी सांगितले. इस्रायल आणि यहुदी लोकांच्या विरोधातील भयावह अत्याचार करणार्यांची बाजू घेणार्या लोकांसोबत...26 Oct 2023 / No Comment /

चिनी कंपन्यांद्वारे पाकिस्तानला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची उपकरणे

चिनी कंपन्यांद्वारे पाकिस्तानला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची उपकरणे– अमेरिकेने लादले प्रतिबंध, वॉशिंग्टन, (२१ ऑक्टोबर) – पाकिस्तानच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी चिनी कंपन्यांद्वारे उपकरणांचा पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उपकरणांचा पाकिस्तानला पुरवठा केल्याबद्दल अमेरिकेने चीनच्या तीन कंपन्यांवर प्रतिबंध लादले असल्याची माहिती अमेरिकेच्या गृह विभागाने दिली. जागतिक अण्वस्त्र अपप्रसारचा एक भाग म्हणून हे प्रतिबंध लादण्यात आले असल्याची माहिती गृह विभागाने निवेदनात दिली. पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायनामधील तीन कंपन्यांनी पाकिस्तानी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी उपकरणांचा पुरवठा केल्याने या कंपन्यांवर...21 Oct 2023 / No Comment /

हमास-इस्रायलच्या युद्धात अमेरिकेची पलटी

हमास-इस्रायलच्या युद्धात अमेरिकेची पलटी– गाझावर इस्रायलचा ताबा ही मोठी चूक ठरेल : आतापर्यंत इस्रायलसोबत दिसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, नवी दिल्ली, (१६ ऑक्टोबर) – मध्यपूर्वेतील वाढत्या रक्तरंजित युद्धादरम्यान इस्रायली सैन्य गाझा पट्टी ताब्यात घेण्यासाठी सतत पुढे जात आहे. आतापर्यंत इस्रायलसोबत युद्धात दिसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहूंना इशारा दिला आहे की, गाझावर इस्रायलचा ताबा ही मोठी चूक ठरेल. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी प्रसारित केलेल्या एका मुलाखतीत इस्रायलला गाझा पुन्हा ताब्यात न घेण्याचा इशारा दिला....16 Oct 2023 / No Comment /