Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » भारत सर्वात मोठा धोका : पाक लष्कराला धास्ती

भारत सर्वात मोठा धोका : पाक लष्कराला धास्ती

Asim-Bajwaइस्लामाबाद, [२४ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात वाढती लोकप्रियता आणि दहशतवादाच्या मुद्यावर एकत्र येत असलेले शक्तिशाली देश यामुळे पाकिस्तानला भारताची चांगलीच धास्ती वाटू लागली आहे. भारत हा आमच्यासाठी सर्वात मोठा धोका असल्याची प्रतिक्रिया पाक लष्कराने व्यक्त केली.
जर्मनीच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाक लष्कराचा प्रवक्ता असीम बाजावा यांनी ही भीती बोलून दाखविली. भारताकडून सातत्याने वाढत असलेल्या धोक्यामुळेच आम्हाला आपली संरक्षण प्रणाली मजबूत करणे भाग पडले आहे, असे बाजवा म्हणाले.
सर्वच ज्वलंत मुद्दे भारतासोबत द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तथापि, स्वातंत्र्यापासून रखडलेला काश्मीरचा प्रश्‍न दोन्ही देशांमधील वादाचे मुख्य कारण आहे. हा प्रश्‍न केवळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच सोडविला जाऊ शकतो. पण, आंतरराष्ट्रीय समुदाय पाकला यात सहकार्य करण्यास तयार नाही, असा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे, बाजवा यांनी अलीकडेच तालिबानचा म्होरक्या मुल्ला अख्तर मंसूरचा खात्मा करणार्‍या अमेरिकन ड्रोन हल्ल्याचाही निषेध केला होता.
मुल्ला मन्सूरला शांततेच्या मुद्यांवर आपली भूमिका पार पाडायची होती. पाक अमेरिकेचा मित्र असतानाही, अमेरिकेने त्याला ठार मारण्यासाठी ड्रोन हल्ला करताना आम्हाला विश्‍वासात घेतले नव्हते. अमेरिकेच्या अशा कारवायांना आम्ही नेहमीच विरोध करू. दहशतवादविरोधी लढ्यात पाकने भरपूर योगदान दिले आहे. असे असतानाही अमेरिका आणि काही पाश्‍चात्त्य देश पाकवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप करीत आहे. हा प्रकार दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28764

Posted by on Jun 25 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया (34 of 351 articles)


सेऊल, [२२ जून] - सोमवारी २५०० किमीची मारक क्षमता असलेल्या घातक क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर उत्तर कोरियाने आज बुधवारी आणखी दोन ...

×