|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.32° C

कमाल तापमान : 28.32° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 2.81 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.32° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.45°C - 30.83°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.06°C - 30.87°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.51°C - 29.59°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.14°C - 29.74°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.94°C - 29.67°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.67°C - 29.76°C

sky is clear

नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचे नोबेल पुरस्कार

नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचे नोबेल पुरस्कारओस्लो, (०६ ऑक्टोबर) – महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढा देणार्या आणि सध्या कारागृहात असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. इराणमधील महिलांवर होणार्या अत्याचाराविरुद्ध दिलेला लढा आणि मानवाधिकारांसाठी केलेले अतुलनीय काम यासाठी नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय नोबेल निवड समितीने घेतला. २०१९ मध्ये हिंसक आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या स्मृती कार्यक‘मात सहभागी झाल्याबद्दल नर्गिस यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्या...6 Oct 2023 / No Comment /

या शास्त्रज्ञांना मिळाले रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक

या शास्त्रज्ञांना मिळाले रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकस्टॉकहोम, (०४ ऑक्टोबर) – मौंगी जी. बावेंडी, लुईस ई. ब्रुस आणि अ‍ॅलेक्सी आय. एकिमोव्ह यांची रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी निवड झाली आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांना स्मॉल क्वांटम डॉट्सवरील संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस हॅन्स एल्ग्रेन यांनी बुधवारी स्टॉकहोममध्ये पुरस्काराची घोषणा केली. नोबेल पारितोषिकात ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (१ दशलक्ष) रोख पारितोषिक असते. हे पैसे पारितोषिकाचे निर्माते, स्वीडिश शोधक अल्फ्रेड नोबेल, १८९६ मध्ये मरण पावलेल्या...4 Oct 2023 / No Comment /

भौतिकशास्त्रात तिघांना नोबेल पारितोषिक

भौतिकशास्त्रात तिघांना नोबेल पारितोषिकस्टॉकहोम, (०३ ऑक्टोबर) – २०२३ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रोस आणि अ‍ॅन एल. हुइलियर या शास्त्रज्ञांना देण्यात येणार आहे. अणु इलेक्ट्रॉन्सच्या अभ्यासात लेसरचा वापर केल्याबद्दल अ‍ॅगोस्टिनी, क्रोझ आणि ल’हुलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पुरस्कार देणार्‍या संस्थेने मंगळवारी सांगितले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा पुरस्कार या शास्त्रज्ञांना पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद पल्स निर्माण करण्याच्या प्रायोगिक पद्धतींसाठी देण्यात येणार आहे. या पुरस्कारांतर्गत देण्यात येणारी...3 Oct 2023 / No Comment /

टॉवर ब्रिज बंद होण्यास अडचणी, वाहतूक खोळंबली

टॉवर ब्रिज बंद होण्यास अडचणी, वाहतूक खोळंबलीलंडन, (३० सप्टेंबर) – नौका जाण्यासाठी टॉवर ब्रिज उघडल्यानंतर तो बंद होण्यास तांत्रिक अडचणी आल्याने लंडनमधील वाहतूक खोळंबल्याचा प्रकार घडला. यावेळी शहरात शेकडो वाहने रस्त्यांवर एकाच ठिकाणी अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या इंग्लंडची राजधानी लंडनमधून थेम्स नदी वाहत असून, तिच्यावर चालू बंद होऊ शकणारा (ही प्रक्रिया पॉप-अप अशा नावाने ओळखली जाते ) टॉवर ब्रिज तयार करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास एका नौकेला तेथून जाण्यास परवानगी...30 Sep 2023 / No Comment /

शी जिनपिंग ‘हुकूमशहा’: जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री बेयरबॉक

शी जिनपिंग ‘हुकूमशहा’: जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री बेयरबॉक-ड्रॅगनचा प्रचंड थयथयाट, नोंदविला निषेध, -जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांचे रोखठोक वक्तव्य, बर्लिन, (२०सप्टेंबर) – जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना ‘हुकूमशहा’ म्हटल्याने ड्रॅगनने प्रचंड थयथयाट केला आहे. जर्मन मंत्र्यांनी जिनपिंग यांना ‘हुकूमशहा’ संबोधल्याबद्दल चीन सरकार इतके संतप्त झाले आहे की त्यांनी अधिकृतपणे जर्मनीकडे निषेध नोंदवला आहे. ‘जर ब्लादिमिर पुतिन यांना युद्धात विजय मिळाला तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासारख्या जगातील अनेक हुकूमशहांना काय संकेत जाईल’ असे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री...21 Sep 2023 / No Comment /

फ्रान्समध्ये आयफोन १२ च्या विक्रीवर बंदी

फ्रान्समध्ये आयफोन १२ च्या विक्रीवर बंदी– किरणोत्सर्ग जास्त असल्यामुळे सरकारचा निर्णय, पॅरिस, (१७ सप्टेंबर) – मर्यादेपेक्षा जास्त किरणोत्सर्गामुळे फ्रान्समध्ये आयफोन १२ च्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. यावर अमेरिकन टेक कंपनी अ‍ॅपलने सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अतिरिक्त किरणोत्सर्गाची समस्या दूर होईल, असा त्यांचा दावा आहे. फ्रान्सने या निर्णयाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे, अ‍ॅपललाही आशा आहे की, सॉफ्टवेअर अपडेटनंतर फ्रान्स ही बंदी उठवेल. एका वृत्तानुसार, फ्रान्सने दावा केला आहे की, आयफोन-१२ मॉडेल युरोपियन...17 Sep 2023 / No Comment /

क्लोनिंगद्वारे पहिली मेंढी जन्माला घालणारे इयान विल्मोट यांचे निधन

क्लोनिंगद्वारे पहिली मेंढी जन्माला घालणारे इयान विल्मोट यांचे निधन-भ्रूणशास्त्रीय संशोधनात लक्ष्यवेधी कार्य, लंडन, (१२ सप्टेंबर) – जगातील पहिली क्लोन सस्तन मेंढी (डॉली) तयार करणारे प्रसिद्ध बि‘टिश भ‘ूणशास्त्रज्ञ सर इयान विल्मुट यांचे निधन झाले. २०१८ मध्ये पार्किन्सन आजाराचे निदान झाल्यानंतर वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रोफेसर विल्मुट यांनी ५ जुलै १९९६ रोजी जन्मलेल्या डॉलीची निर्मिती करण्यासाठी एडिनबर्ग विद्यापीठातील रोझलिन इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांच्या चमूचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्याने स्टेम सेल संशोधनाचा पाया घातला. इयान विल्मोट यांचा जन्म इंग्लंडमधील...12 Sep 2023 / No Comment /

गीता, उपनिषदे मीही वाचले, पण भाजपसारखे…!

गीता, उपनिषदे मीही वाचले, पण भाजपसारखे…!– राहुल गांधींचा पॅरिसमधून हल्ला, पॅरिस, (१० सप्टेंबर) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या युरोप भेटीवर आहेत. राहुल गांधी यांनी पॅरिसमधील स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सचे विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया विरुद्ध भारत आणि हिंदुत्व मुद्यावरून मोदी सरकारवर टीका केली. केंद्र सरकारची नीती लोकशाही देशाच्या दृष्टीने हिताची नाही, असे ते म्हणाले. मी गीता वाचली आहे. उपनिषद वाचले आहेत तसेच हिंदू धर्माविषयी अनेक पुस्तके वाचली आहेत, पण भारतीय जनता...10 Sep 2023 / No Comment /

राहुल गांधी ब्रसेल्समध्ये युरोपियन युनियनच्या खासदारांची बैठक घेणार

राहुल गांधी ब्रसेल्समध्ये युरोपियन युनियनच्या खासदारांची बैठक घेणारब्रुसेल्स, (०७ सप्टेंबर) – सहा दिवसांच्या युरोप दौर्‍यावर गुरुवारी सकाळी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे पोहोचलेले काँग्रेस नेते राहुल गांधी भारतीय प्रवासी आणि युरोपियन युनियनच्या खासदारांशी संवाद साधतील. त्यांची भेट अशा वेळी आली आहे जेव्हा नवी दिल्ली राष्ट्रीय राजधानीत ९ ते १० सप्टेंबर दरम्यान बहुप्रतिक्षित जी२० शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे, जिथे अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, चीन आणि इतर देशांचे नेते त्यांची उपस्थिती दर्शवतील. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्तही त्यांची भेट...7 Sep 2023 / No Comment /

हिंदू असण्याचा मला गर्व : ऋषी सुनक

हिंदू असण्याचा मला गर्व : ऋषी सुनक– भारतीयांसोबत जुळलेला राहील, नवी दिल्ली, (०७ सप्टेंबर) – हिंदू असण्याचा मला गर्व आहे. माझी पत्नी भारतीय असण्यासोबतच गौरवान्वित हिंदू होण्याच्या नात्याने मी नेहमी भारत आणि भारतीय लोकांसोबत जुळलेला राहील. माझ्या भारतीय मुळाचा आणि भारतासोबत असलेल्या संबंधांचाही मला अतिशय गर्व आहे, असे प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. जगासमोर येणारी सर्वांत मोठी आव्हाने परतवण्यासाठी आम्ही जी-२०च्या अध्यक्षतेच्या माध्यमातून भारतासोबत काम करू. २०२३ भारतासाठी खूप मोठे...7 Sep 2023 / No Comment /

हुमायूंची कबर हिंदूंचे आध्यात्मिक ठिकाण: ब्रिटिश वृत्तपत्राने तोडले अकलेचे तारे

हुमायूंची कबर हिंदूंचे आध्यात्मिक ठिकाण: ब्रिटिश वृत्तपत्राने तोडले अकलेचे तारेलंडन, (०५ सप्टेंबर) – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या भारतात आगमनाबाबत ब्रिटीश मीडिया सातत्याने कव्हरेज करत आहे. दरम्यान, एका आघाडीच्या ब्रिटीश वृत्तपत्रातील एका लेखाने वाद निर्माण केला आहे. एका वृत्तपत्राने आपल्या एका अहवालात हुमायूंच्या कबरीला ’हिंदूंसाठी अध्यात्मिक ठिकाण’ म्हटले आहे, त्यामुळे लोक नाराजी व्यक्त करत आहेत. या अहवालात असे लिहिले आहे की, ’पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांच्या भारत...5 Sep 2023 / No Comment /

मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान

मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदानअथेन्स, (२५ ऑगस्ट) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अथेन्समध्ये ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन साकेलारोपौलो यांच्या हस्ते ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला. यापूर्वी अथेन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष साकेलारोपौलो यांच्या भेटीदरम्यान चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल सांगितले. ते म्हणाले, चांद्रयान-३ चे यश हे केवळ भारताचे यश नाही तर ते संपूर्ण मानवजातीचे यश आहे.चांद्रयान-३ मोहिमेद्वारे संकलित केलेल्या डेटाचे परिणाम संपूर्ण वैज्ञानिक बंधुत्व आणि मानवजातीला मदत करतील. पंतप्रधान...25 Aug 2023 / No Comment /