Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » व्हर्गिस कुरियन जयंतीनिमित्त गुगलचे डुडल

व्हर्गिस कुरियन जयंतीनिमित्त गुगलचे डुडल

Verghese-Kurien-Google-Doodleकॅलिफोर्निया, [२६ नोव्हेंबर] – भारतातील धवलक्रांतीचे पितामह डॉ. व्हर्गीस कुरियन यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त सर्च इंजिन ‘गुगल’ने त्यांचे कल्पक डुडल तयार करून त्यांचा श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारताली दुग्ध उत्पादनात अग्रेसर बनविण्यात कुरियन यांचा महत्वपूर्ण वाटा आहे.
‘अमूल’ या दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन करणार्‍या संस्थेची स्थापना व्हर्गिस कुरियन यांनी केली आहे. डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीडीबी’ने ऑपरेशन फ्लड’ सुरू केले आणि अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. कुरियन यांनी गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाची स्थापना केली. अशा संस्थांद्वारे व्हर्गिस यांनी स्थानिक दूध विक्रेत्यांना योग्य भाव देऊन संस्थेत भागीदारीही दिली. लोकसहभागातून व्यवस्थापन ही कल्पना त्यांनी यशस्वीपणे राबविली. २००७ पर्यंत सलग ३४ वर्षे ते या महासंघाच्या अध्यक्षपदी होते.
त्यांच्या या अभूतपूर्व कार्याबद्दल त्यांना मॅगेसेसे, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आज त्यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त गुगलकडून एका खास डुडलद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली. गुगलकडून बनविण्यात आलेल्या या डुडलमध्ये डॉ. कुरियन एका स्टुलावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या बाजुला दूध काढण्यासाठी वापरण्यात येणारे कॅन आणि गाई दिसत आहेत. याशिवाय या डुडलमध्ये कुरियन आणि त्यांच्या बाजुला उभ्या असणार्‍या गायीच्या पायाशी एक दोर पडलेला दाखविला आहे. या दोराच्या साहाय्यानेच गुगलचा लोगो कलात्मकरित्या साकारण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25755

Posted by on Nov 27 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (154 of 351 articles)


वॉशिंग्टन, [२६ नोव्हेंबर] - इसिस समुहाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेने सीरियावर प्रतिबंध घातला आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांचे सरकार आणि ...

×