Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » अमेरिका भारताला २२ गार्डियन ड्रोन्स देणार

अमेरिका भारताला २२ गार्डियन ड्रोन्स देणार

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा,
नवी दिल्ली, २३ जून –
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच अमेरिका दौर्‍यामुळे दोन्ही देशांमधील मैत्री आणखी घट्ट होण्याचे संकेत मिळाले आहेत. या भेटीच्या काळात अमेरिका भारताला २२ गार्डियन ड्रोन्स विकण्याबाबतचा करार करण्याची शक्यता आहे.
या ड्रोन्सच्या व्यवहाराला अमेरिकन कॉंगे्रसची मंजुरी आवश्यक असली, तरी प्रशासकीय स्तरावर मिळालेली मंजुरी दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांना मिळालेली बळकटीच असल्याचे मानले जात आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात भारत आणि अमेरिकेतील संबंध नव्या उंचीवर पोहोचले होते. पण, ट्रम्प यांच्या काळात या संबंधांना काही प्रमाणात तडा गेली.
ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी चीनची मदत मागितली होती.
भारतीय समुद्रावर रात्रीच्या काळोखातही बारीक नजर ठेवण्यासाठी भारतीय नौदलाला अशाच प्रकारच्या ड्रोन्सची गरज आहे. विशेष म्हणजे, नाटोचा सदस्य नसतानाही भारतासोबत होत असलेला अशा प्रकारचा हा पहिलाच व्यवहार ठरणार आहे. (वृत्तसंस्था)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34791

Posted by on Jun 24 2017. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (56 of 2483 articles)


=अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात विधेयक सादर, वॉशिंग्टन, २३ जून - दहशतवादविरोधी लढ्यातील महत्त्वाचा मित्र म्हणून पाकिस्तानला जो दर्जा देण्यात आला आहे, ...

×