richwood
richwood
richwood
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » अमेरिकेच्या कम्युनिटी सेंटरमध्ये गोळीबार, १४ ठार

अमेरिकेच्या कम्युनिटी सेंटरमध्ये गोळीबार, १४ ठार

california-shootingकॅलिफोर्निया, [३ डिसेंबर] – अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात सॅन बर्नडिनो येथे ३ अज्ञात शस्त्रधारकांनी अंदाधुंद गोळीबार केला असून यात १४ जण ठार आणि २० जण जखमी झाले आहेत. पोलिस कारवाईत एका महिलेसह दोन हल्लेखोर ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल बुधवारी रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला.
सॅन बर्नाडिनो येथील इनलँड रिजनल सेंटरच्या अपंगांवर उपचार करण्याकरीता बांधण्यात आलेल्या रूग्णालयाच्या आवारात रूग्णांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी सुरू असताना हल्लेखोरांनी गोळीबार केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी इमारतीला घेराव घातला असून हल्लेखोरांविरोधात सशस्त्र कारवाई सुरू केली आहे. यात दोघा मारेकर्‍यांना ठार केलं असून यात एका महिलेचाही समावेश आहे. दरम्यान एका आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.
या क म्युनिटी सेंटरमधील एका व्यक्तिने सांगितले आहे, की पार्टी सुरू असताना एका व्यक्तिचे काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यानंतर ती व्यक्ती पार्टीमधून बाहेर पडली. काही वेळाने तिच्यासोबत आणखी काही जण पार्टीत दाखल झाले होते. मात्र हा हल्ला त्यांनीच केला हे सांगता येणार नाही. तसेच हे हल्लेखोर गॅगस्टर आहेत की दहशतवादी याचीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी एक कार ताब्यात घेतली असून त्यात स्फोटके आढळली आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. काहीच दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर अमेरिकेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे काळजी व्यक्त केली जात आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25946

Posted by on 3:15 pm. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google