Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे गुरुवारी भूमिपूजन

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे गुरुवारी भूमिपूजन

►२०२२ मध्ये धावणार भारतात,
नवी दिल्ली, ११ सप्टेंबर  –
अहमदाबाद ते मुंबई या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भूमिपूजन गुरुवार, १४ सप्टेंबरला अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज सोमवारी एका पत्रपरिषदेत सांगितले. २०२३ लक्ष्य असले तरी भारतातील पहिली बुलेट ट्रेन २०२२ मध्येच धावेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनाने भारतीय रेल्वेत सुरक्षा, वेग आणि सेवेच्या एका नव्या युगाचा प्रारंभ होत आहे, असे स्पष्ट करत गोयल म्हणाले की, व्याप्ती, गती आणि कौशल्याच्या बाबतीत भारतीय रेल्वेकडे जगाचे नेतृत्व येण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.देशातील महत्त्वाकांक्षी अशा बुलेट ट्रेनसाठी जपान ८८ हजार कोटींचे कर्ज ०.१ टक्के व्याजदराने देणार आहे, आजपयर्र्त जगाच्या इतिहासात कोणत्याच देशाला एवढ्या कमी व्याजदरात एवढे मोठे कर्ज मिळालेले नाही. विशेष म्हणजे या कर्जाची परतफेड १५ वर्षानंतर सुरू होणार असून ५० वर्षांच्या दीर्घ कालावधीत हे कर्ज आपल्याला फेडायचे आहे, हाही एक विक्रम आहे.  या कर्जावर आपल्याला दरमहा ७ ते ८ कोटी रुपये व्याज द्यावे लागणार आहे. जागतिक बँक आणि अन्य कोणत्याही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडून आपण कर्ज घेतले असते तरी आपल्याला ५ ते ७ टक्के व्याज द्यावे लागले असते, असे ते म्हणाले.
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे आपले मेक इन इंडियाचे स्वप्न साकारणार आहे, कारण बुलेटट्रेनचे तंत्रज्ञान जपान आपल्याला देणार आहे, याकडे लक्ष वेधत गोयल म्हणाले की, या प्रकल्पाच्या काळात २० हजार प्रशिक्षित असा रोजगार निर्माण होणार आहे. या प्रशिक्षित कर्मचार्‍याच्या आधारे देशाच्या अन्य भागातही बुलेट ट्रेनची उभारणी आपल्याला मेक इन इंडियाच्या आधारे करता येणार आहे. हायस्पीड रेल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वडोदरा येेथे उभारली जाणार असून २०२० च्या अखेरीस या इन्स्टिट्यूटमधून जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतातील अधिकार्‍यांना प्रशिक्षित केले जाणार आहे, येत्या तीन वर्षांच्या काळात या इन्स्टिट्यूटमधून चार हजार अधिकारी तयार होतील, जे भारतातील बुलेट ट्रेनचे संचालन यशस्वीपणे करतील, असे गोयल म्हणाले. भूमिपूजनानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला लगेच सुरुवात होणार आहे. बुलेट ट्रेनचे भाडे अद्याप ठरवण्यात आले नाही, असे ते म्हणाले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍विनीकुमार लोहानी उपस्थित होते.
दोन तासांत ५०८ किमीचे अंतर कापणार
बुलेट ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबाद हे ५०८ किमीचे अंतर २ तास ७ मिनिटात गाठता येणार आहे, सध्या या अंतरासाठी ७ ते ८ तास लागतात, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या १२ ठिकाणी बुलेट ट्रेनचे थांबे राहतील, याकडे लक्ष वेधत गोयल म्हणाले की, मुंबईतील स्थानक भूमिगत राहील, बाकीची स्थानके जमिनीवरची राहतील.
५०८ किमीचे अंतर ३२० किमी प्रतितासाच्या वेगाने कापले जाईल, बुलेट ट्रेनचा १५६ किमी मार्ग महाराष्ट्रात, ३५१ किमीचा मार्ग गुजरातमध्ये तर २ किमीचा मार्ग दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात राहणार आहे. या मार्गावर २१ किमीचा सर्वात मोठा बोगदा राहणार असून यातील ७ किमीचा बोगदा हा समुद्राखाली राहणार आहे. (तभा वृत्तसेवा)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34931

Posted by on Sep 12 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (24 of 2477 articles)


-• डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन -• पुनरुत्थान विद्यापीठातर्फे भारतीय शिक्षा ग्रंथमालेचे लोकार्पण, नवी दिल्ली, ९ सप्टेंबर - भारतीय संस्कृतीला ...

×