Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » आता मोटारीने जाता येणार थायलंड, म्यानमारला

आता मोटारीने जाता येणार थायलंड, म्यानमारला

=१४०० किमीचा महामार्ग तयार होणार=
india-thailand highwayनवी दिल्ली, [२४ मे] – भारत, थायलंड आणि म्यानमार या तीन देशांना जोडणारा १४०० किलोमीटर लांबीचा महामार्ग नजीकच्या भविष्यातच तयार केला जाणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर भारत दक्षिण-पूर्व देशांसोबत थेट जोडला जाणार असून, यामुळे पर्यटनालाही मोठा वाव मिळणार आहे.
भारताचे थायलंडमधील राजदूत भगवंत सिंह बिश्‍नोई यांनी याबाबतची माहिती दिली. म्यानमारमध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या काळात तयार करण्यात आलेल्या ७३ पुलांच्या मदतीने हा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागण्याची अपेक्षा असून, त्यानंतर हा महामार्ग भारत, थायलंड आणि म्यानमार या तिन्ही देशांसाठी खुला केला जाणार आहे, असे बिष्णाई यांनी सांगितले.
हा महामार्ग मणिपूरच्या मोरेह भागातून तयार करण्यात येईल आणि तो म्यानमारच्या तामू शहरातून थायलंडच्या माई सोट जिल्ह्यापर्यंत पोहोचेल. या महामार्गासाठी तिन्ही देशांमध्ये मोटर व्हेईकल ऍग्रीमेंटवर चर्चा करण्यात येत आहे. भारत आणि थायलंडमध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक साम्य आहेत. या महामार्गामुळे व्यापार, पर्यटनासोबत अन्य गोष्टीही जोडल्या जातील. विशेष म्हणजे, आगामी काळात या महामार्गाने तामिळनाडूतील चेन्नई शहरालाही जोडण्याचा आमचा प्रस्ताव असल्याचे बिश्‍नोई म्हणाले.
आठ वर्षांपूर्वी भारत आणि थायलंडमध्ये ८ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता. याशिवाय, गेल्या वर्षी सुमारे १० लाख भारतीय थायलंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते. त्यामुळे भारत आणि थायलंडला जोडणारा महामार्ग तयार करणे आवश्यक असल्याचे दोन्ही देशांचे मत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28491

Posted by on May 25 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (272 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२४ मे] - मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त केंद्रीय अल्पसंख्यक विकास मंत्री डॉ. नजमा हेपतुल्ला यांनी ...

×