Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » आर्थिक समावेशकता सरकारचे उद्दिष्ट

आर्थिक समावेशकता सरकारचे उद्दिष्ट

=पंतप्रधानांचे प्रतिपादन=
pm-modi-inaugurates-conference-of-dalit-india-chamber-of-commerce-n-industry-14नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – आर्थिक समावेशकता हेच सरकारचे सर्वांत मोठे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन करताना, मुद्रा योजनेंतर्गत बँकांनी लहान उपक्रमांना आतापर्यंत ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी दिली.
औद्योगिकीकरणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कल्पना यावरील दलित उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. लहान व्यवसायांमध्ये व्यस्त असलेल्या अनु. जाती, जमाती, अन्य मागासवर्गीय आणि महिला उद्योजकांना मुद्रा योजनेंतर्गत बँकांनी कुठलाही जामीन न मागता ५० हजार कोटींचे कर्ज दिले असून, या उपक्रमांनी १४ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
यापूर्वी अनु. जाती, जमातीतील उद्योजकांसाठी बँकांकडून कर्ज प्राप्त करणे अतिशय कठीण कार्य होते. पण, आपल्या सरकारने ही प्रक्रियाच सुलभ केली आहे. आर्थिक समावेशकता हेच आपल्या सरकारचे प्राधान्याचे धोरण आहे. रोजगार मिळविणारे नाही, तर रोजगार निर्माते यातून घडविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
तुमच्याप्रमाणेच मीदेखील अपमान सहन केला आहे. सामंतशाही मानसिकता आजही अस्तित्वात असल्याचे दिसते. दलितांनी प्रत्येक प्रकारचा अपमान सहन केला आहे, असे सांगताना पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या उद्धारात दिलेले योगदान अमूल्य असल्याचे मत व्यक्त केले. बाबासाहेब केवळ घटनेचे शिल्पकारच नसून, ते फार मोठे अर्थतज्ज्ञही होते. औद्योगिकीकरणामुळेच दलितांना जास्तीतजास्त फायदे मिळतील, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हे विचार त्यांनी फार आधीच मांडले होते.
सेल्फीही काढल्या
या कार्यक्रमानंतर सर्व शिष्टाचार बाजूला सारून पंतप्रधान व्यासपीठावरून खाली आले आणि उपस्थितांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत त्यांनी सेल्फी घेतल्या. लोकांसोबत मिसळण्याच्या पंतप्रधानांच्या या भूमिकेमुळे दलित कार्यकर्ते चंद्रभान इतके भावूक झाले की, ते आभार प्रदर्शनाचे भाषणही पूर्ण करू शकले नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26320

Posted by on Dec 29 2015. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (971 of 2477 articles)


=बडतर्फ अधिकार्‍याला अटक= नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] - लष्करासोबतच भारतीय हवाई दलातही असलेले पाकिस्तानच्या आयएसआयचे जाळे मोडित काढताना दिल्ली पोलिसांच्या ...

×