Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » आसामात उमललं भाजपाचं कमळ!

आसामात उमललं भाजपाचं कमळ!

  • कॉंग्रेस,डाव्यांना केरळ आणि बंगालमध्ये नारळ
  • बंगालमध्ये दीदींवरच ‘ममता’
  • तामिळनाडूत अम्मांचाच करिश्मा
  • पुद्दुचेरीत कॉंग्रेस काठावर

bjp-flags-victoryनवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने आसामात दणदणीत विजय मिळवला. भाजपाने कॉंग्रेसला सत्तेतून खाली खेचताना येथे प्रथमच कमळ फुलवून नवा इतिहास घडविला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस आणि तामिळनाडूत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने नेत्रदीपक विजयासह आपली सत्ता कायम राखली, तर केरळात डाव्या आघाडीने कॉँग्रेसप्रणीत युडीएफ आघाडीला मागे टाकत सत्ता सिंहासनापर्यंत मजल मारली. इतर चारही ठिकाणी सपाटून मार खावा लागलेल्या कॉंग्रेसला पुद्दुचेरीत द्रमुकच्या सहकार्याने निसटते बहुमत मिळाले आहे.
प्रमुख विजयी उमेदवार
सर्वानंद सोनोवाल, ममता बॅनर्जी, ओमन चंडी, जयललिता, व्ही. एस. अच्युतानंदन, ओ. राजगोपाल, लक्ष्मीरतन शुक्ला.
प्रमुख पराभूत
श्रीशांत, रूपा गांगुली, बायच्युंग भूतिया, पवनसिंह घाटोवार, बदरुद्दिन अजमल.
आसाम
एकूण जागा – १२६ (बहुमत ६४)
भाजपा आघाडी – ८७
कॉंग्रेस आघाडी- २४
एआययूडीएफ- १३
इतर- ०२
पश्‍चिम बंगाल
एकूण जागा -२९४ (बहुमत १४८)
तृणमूल- २११
डावी आघाडी- ७६
भाजपा – ०६
इतर- ०१
तामिळनाडू
एकूण जागा- २३४ (बहुमत ११८)
अद्रमुक- १३४
द्रमुक आघाडी- ९७
डीएमडीके आघाडी- ००
इतर- ०१
केरळ
एकूण जागा- १४०(बहुमत ७१)
एलडीएफ – ८४
युडीएफ- ४६
भाजपा- ०१
इतर- ०९
पुद्दुचेरी
एकूण जागा- ३० (बहुमत १६)
कॉंग्रेस-द्रमुक- १७
एआयएनआरसी- ०८
अद्रमुक – ०४
इतर- ०१

Short URL: https://vrittabharati.in/?p=28345

Posted by on May 19 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (314 of 2477 articles)


नवी दिल्ली, [१९ मे] - आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत आघाडीला मिळालेला विजय अद्‌भुत आणि ऐतिहासिक आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र ...

×