Home » आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » आसामात ऐतिहासिक विजय

आसामात ऐतिहासिक विजय

modi, amit shah, sonowalनवी दिल्ली, [१९ मे] – आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत आघाडीला मिळालेला विजय अद्‌भुत आणि ऐतिहासिक आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले असून, आसामी जनतेचे स्वप्न आणि इच्छाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे.
तसेच पश्‍चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अथक परिश्रम करून तूल्यबळ लढत दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. देशभरात जनतेचा भाजपावरील विश्‍वास वाढत आहे आणि सर्वव्यापी व सर्वसमावेशक विकास करणारा पक्ष म्हणून लोक भाजपाकडे आशेने बघत आहेत, असेही पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीचे कल स्पष्ट झाल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार व केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे अभिनंदन करतानाच सामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्‍वासन देताना पंतप्रधानांनी आसाममधील जनतेला धन्यवाद दिले.
केरळमध्ये पक्षाने गेल्या अनेक वर्षांपासून दिलेला लढा आता फलदायी ठरत असून, आता आम्ही जनतेचा सक्षम आवाज झालो आहोत. केरळात भाजपाची उभारणी करणार्‍यांना मी सॅल्यूट करतो. वर्षानुवर्ष यासाठी अथक परिश्रम करणार्‍या कार्यकर्त्यांमुळेच आजचा दिवस बघायला मिळाला आहे, असेही पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जया, ममता, अच्युतानंदन यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
तामिळनाडू आणि पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करून सत्ता कायम राखणार्‍या अण्णाद्रमुक नेत्या जयललिता आणि तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. याशिवाय केरळात डाव्या आघाडीला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणारे नेते अच्युतानंदन यांचेही मोदींनी अभिनंदन केले. ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे झाले व मी त्यांचे अभिनंदन करतानाच दुसर्‍या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे जयललिता व अच्युतानंदन यांच्याशीही बोलून त्यांचेही अभिनंदन केले, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28342

Posted by on May 19 2016. Filed under आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (312 of 2474 articles)


=अम्मा-दीदींना भरघोस यश= नवी दिल्ली, [१९ मे] - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने आसामात ...

×