Home » आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » आसामात भाजपा सरकार सत्तारूढ

आसामात भाजपा सरकार सत्तारूढ

  • आसामात भाजपाराज
  • आघाडीतील १० मंत्र्यांचा समावेश

assam sonowal oath taking ceremony.गुवाहाटी, [२४ मे] – आसामात आज मंगळवारी प्रथमच भाजपा सरकार पदारूढ झाले आहे. भाजपा नेते सर्वानंद सोनोवाल यांनी राज्याचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, सोबतच या राज्यात ऐतिहासिक पर्वाला प्रारंभ झाला आहे. सोनोवाल यांच्यासह अन्य १० सदस्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, या राज्यात भाजपा प्रथमच सत्तेवर आली असून, सोनोवाल यांना भाजपाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे.
खानपाडा मैदानात झालेल्या शानदान सोहळ्यात राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी सर्वप्रथम सोनोवाल यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर अन्य १० मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. सोनोवाल यांनी आसामी भाषेत शपथ घेतली.
सर्वानंद सोनोवाल यांच्या व्यतिरिक्त भाजपाच्या सहा, आसाम गण परिषदेच्या दोन, बोडो पीपल्स फ्रंटच्या दोन सदस्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. भाजपाच्या कोट्यातून हेमंता बिश्‍वा शर्मा, चंद्र मोहन पटवारी, रणजित दत्ता, परिमल सुकलाबैद्य, पल्लब लोचन दास आणि नाबा कुमार डॉली यांनी, आगपच्या कोट्यातून अतुल बोरा आणि केसाब महंत, तर बीपीएफच्या कोट्यातून प्रमिला राणी ब्रह्मा व रिहान डायमेरी यांनी शपथ घेतली. ब्रह्मा व डायमेरी यांनी बोडो भाषेतून, तर सुकलाबैद्य यांनी बंगाली भाषेतून शपथ घेतली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने गेल्या १५ वर्षांपासून आसामात सत्तेवर असलेल्या कॉंगे्रसला सत्ताच्युत करून प्रथमच स्पष्ट बहुमत मिळविले होते.
पंतप्रधान, भाजपाध्यक्ष उपस्थित
या अद्वितीय शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पक्षाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, रामविलास पासवान, एम. व्यंकय्या नायडू, निर्मला सीतारमन, राजीव प्रताप रुडी, जितेंद्र सिंह, जयंत सिन्हा, किरेन रिजीजू आणि व्ही. के. सिंह, तसेच भाजपाशासीत राज्यांचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (मध्यप्रदेश), वसुंधरा राजे (राजस्थान), आनंदी बेन पटेल (गुजरात), देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), मनोहरलाल खट्टर (हरयाणा), डॉ. रमण सिंह (छत्तीसगड), रघुबर दास (झारखंड), लक्ष्मीकांत पारसेकर (गोवा) प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय, मित्रपक्षांचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल (पंजाब) आणि एन. चंद्राबाबू नायडू (आंध्रप्रदेश) त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कालिको पूल आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री पी. के. चामलिंग, झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे देखील उपस्थित होते.
झपाट्याने विकास करणार : पंतप्रधान
शपथविधी सोहळ्यानंतर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामसोबतच ईशान्येकडील सर्व राज्यांचा जलदगतीने विकास करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही दिली. पूर्वोत्तर धोरण कायद्यानुसार विकासासाठी येथील राज्यांना केंद्राकडून जे काही सहकार्य हवे आहे, ते सर्व केंद्राकडून तातडीने प्राप्त होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28505

Posted by on May 25 2016. Filed under आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (266 of 2477 articles)


=मोदी सरकारची दोन वर्षे, २०० केंद्रांतून देणार विकास कामांची माहिती= नवी दिल्ली, [२४ मे] - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार येत्या ...

×