एनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक!
Tuesday, November 21st, 2017हैदराबाद, २० नोव्हेंबर – एनर्जी ड्रिंक्समुळे किडनी खराब होण्याची आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. तसेच त्याचे हृदयावर प्रतिकूल परिणाम होतात, असे डॉक्टरांच्या एका अभ्यासातून समोर आले आहे. त्याचबरोबर, दारू आणि एनर्जी ड्रिंक्स एकत्रित प्यायल्यास झिंग चढते, असेही या अभ्यासात सिद्ध झाले आहे.
हैदराबदमधील एका किडनीरोग तज्ज्ञांच्या मते, एनर्जी ड्रिंक्समध्ये फॉस्फोरस आणि फॉस्फोरिक ऍसिड असते, त्यामुळे त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. जेव्हा दारूमध्ये एनर्जी ड्रिंक्स मिसळून प्यायले जाते, त्यावेळी त्यातील उत्तेजक द्रव्य पिणार्याला अक्रियाशील करते. त्यामुळे पिणार्याला कुठलेही भान राहत नाही आणि तो सतत पित जातो. त्यामुळे पिणार्याला अधिक झिंग चढते.
त्याचबरोबर, एनर्जी ड्रिंक्स आणि दारू यांचे मिश्रण मळमळ होण्यास आणि किडनीवर परिणाम करण्यास कारणीभूत ठरते. कारण उत्तेजक द्रव्य शरीरातील पाणी कमी करते.
एनर्जी ड्रिंक्ससोबत दारू पिणार्यांचे अपघात होण्याची शक्यता वाढते. कारण ते एवढ्या प्रमाणात झिंगलेले असतात की, त्यांना कोणतेही भान उरत नाही. एनर्जी ड्रिंक्स पिणार्यांच्या रक्तदाबात ६.४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
एनर्जी ड्रिंक्समधील उत्तेजक द्रव्य हृदयाला घातक असतातच. शिवाय, तेच एनर्जी ड्रिंक्स दारूमधून प्यायल्यास हृदयच्या रक्तपुरवठ्यावरही परिणाम करतात. त्याचबरोबर, अरिथिमिया वाढवते, ज्यामुळे हृदयाचे ठोके व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे हृदयाला नुकसान होण्याची शक्यता वाढते. एखाद्या २०० मिलिलीटरच्या एनर्जी ड्रिंक्समध्ये १०० मिलिग्रॅम उत्तेजक द्रव्य असते.
भारतात रेड बुल, मॉन्स्टर, मॉण्टेन ड्यु, टी झिंगा, क्वाऊड नाइन, क्रन्क, एक्स पॉवर, कॅफे क्युबा, बर्न, ब्लू हे एनर्जी ड्रिंक्सचे बॅ्रण्ड्स अधिक प्रचलित आहेत. (वृत्तसंस्था)
Short URL: https://vrittabharati.in/?p=35008

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!