richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » कर्जमाफीबाबत फडणवीस-पवार यांच्यात चर्चा

कर्जमाफीबाबत फडणवीस-पवार यांच्यात चर्चा

नवी दिल्ली, २३ जून – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्ली दौर्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे समजते.
रालोआचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज सादर करतांना भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्यास भाजपाने सांगितले होते. त्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत आले होते. यावेळी फडणवीस यांनी शरद पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र त्यानंतरही राज्यातील शेतकर्‍यांचे आंदोलन चालू आहे. त्या मुद्यावर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाल्याचे समजते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे उपस्थित होते.
शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयाचा जास्तीतजास्त फायदा शेतकर्‍यांना मिळण्याच्या दृष्टीने या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
गतवर्षीच्या ३० जूनपर्यंत ज्या शेतकर्‍यांचे कर्ज थकित आहे, त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले. या शेतकर्‍यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. राज्यातील ८३ टक्के शेतकर्‍यांना या निर्णयाचा फायदा मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ज्या शेतकर्‍यांनी कर्जाची नियमित फरतफेड केली, त्यांनाही कर्जमाफीच्या निर्णयाचा फायदा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. (तभा वृत्तसेवा)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34794

Posted by on 12:53 am. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google