richwood
richwood
richwood
Home » उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

=योगी आदित्यनाथ यांचा चिमटा,
लखनौ, २० नोव्हेंबर – संपूर्ण भारत देश खर्‍या अर्थाने कॉंग्रेसमुक्त करायचा असेल, तर राहुल गांधी यांची कॉंगे्रसच्या अध्यक्षपदी निवड होणे आवश्यक आहे, अशा शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चिमटा काढला.
देशाला कॉंगे्रसमुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा निर्धारच आहे. आतापर्यंत अध्यापेक्षा जास्त देशाला कॉंगे्रसपासून मुक्ती मिळाली आहे, आता शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. राहुल गांधी जेव्हा कॉंगे्रसच्या अध्यक्षपदी आरूढ होतील, त्या दिवसापासून देश कॉंगे्रसमुक्त होण्यास सुरुवात होईल, असे आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
गुजरात विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, या राज्यात भाजपाला १५० पेक्षा जास्त जागा मिळतील. कॉंगे्रसने कितीही प्रयत्न केले, तरी या राज्यात त्यांना सत्ता स्थापन करणे शक्य होणार नाही.
गुजरातची सत्ता प्राप्त करण्यासाठी राहुल गांधी सध्या गुजरातमधील मंदिरांच्या पायर्‍या झिजवत आहेत. मला आनंद होत आहे, कारण त्यामुळे त्यांची बुद्धी शुद्ध होत आहे. मात्र त्यांच्याच कॉंग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करीत, भगवात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे सर्व काल्पनिक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता राहुल गांधी मंदिरात का जात आहेत, असा प्रश्‍न देशवासीयांना पडणे स्वाभाविकच आहे, याकडे आदित्यनाथ यांनी लक्ष वेधले. बरं, राहुल गांधींना मंदिरात नीट बसताही येत नाही. एका मंदिरात असे बसले, जसे नमाज पठण करीत आहेत, असा टोलाही योगी आदित्यनाथांनी काढला.
राहुल गांधींना शुभेच्छा
राहुल गांधी आता कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार आहेत, त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. ते जितक्या लवकर या पदावर विराजमान होतील, तितक्याच लवकर देशाला कॉंगे्रसपासून मुक्ती मिळेल, असे योगी म्हणाले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=35006

Posted by on 11:31 pm. Filed under उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google