Home » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

=ऑटोरिक्षा परवाना घोटाळा=
Protest by Delhi BJP against autocratic behavior of Kejriwal Governmentनवी दिल्ली, [२८ डिसेंबर] – ऑटोरिक्षा परवाना वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज सोमवारी केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केलीत.
हा घोटाळा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून, यासाठी केवळ केजरीवाल आणि दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय हेच जबाबदार आहेत. भ्रष्टाचारावर आळा घालण्याच्या गप्पा मारून दिल्लीत सत्तेवर आलेल्या केजरीवालांना या घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सत्तेवर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, असा आरोप आंदोलनाचे नेतृत्व करणारे दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीष उपाध्याय यांनी सांगितले.
दिल्लीतील ज्या ऑटोरिक्षा चालकांनी केजरीवाल यांच्या फसव्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवून त्यांच्या आम आदमी पार्टीला मतदान केले, त्याच ऑटो चालकांचा केजरीवाल यांनी विश्‍वासघात केला आहे. घोटाळेबाजांना संरक्षण, दिल्लीतील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था तसेच ऑटोरिक्षा परवाना वाटपातील घोटाळा यामुळे दिल्लीकरांचा या सरकारवरील विश्‍वास आता उडालेला असल्याने केजरीवाल यांनी राजीनामा द्यायलाच हवा, असेही उपाध्याय म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26289

Posted by on Dec 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (982 of 2477 articles)


=संसदेचे हिवाळी अधिवेशन= नवी दिल्ली, [२४ डिसेंबर] - भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसदेत सदस्यांनी व्यापक चर्चा करून जनहिताचे निर्णय ...

×