richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » कॉंग्रेस ३, सेना २, भाजपा १, राष्ट्रवादी १ जागा

कॉंग्रेस ३, सेना २, भाजपा १, राष्ट्रवादी १ जागा

=विधान परिषद निवडणूक=
deshmukh, paricharakमुंबई, [३० डिसेंबर] – भाजपाचे गिरीश व्यास विधान परिषदेवर अविरोध विजयी झाल्यानंतर उर्वरित सात जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉंगे्रसने तीन आणि शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळविला आहे. तर भाजपा व राष्ट्रवादी कॉंगे्रसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांवर कॉंगे्रस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-शिवसेना युतीला संमिश्र यश मिळाले. विधान परिषदेच्या एकूण आठ जागा रिक्त होत्या. त्यापैकी नागपुरात भाजपाचे गिरीश व्यास अविरोध निवडून आले होते. त्यामुळे सात जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. आज बुधवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काही तासातच निवडणुकीचे निकाल झाले.
मुंबईत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे रामदास कदम आणि कॉंग्रेसचे भाई जगताप यांनी विजय मिळविला. त्यामुळे मुंबईत दोन भाई विजयी झाले. ही निवडणूक खर्‍या अर्थाने लक्षणीय ठरली ती राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्यामुळे. त्यांनी भाई जगताप यांना निकराची लढत दिली. यात भाई जगताप अवघ्या दोन मतांनी विजयी झाले. कोल्हापूरच्या जागेवर कॉंग्रेसचे सतेज पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी कॉंग्रेसचेच बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांना पराभूत केले. कॉंग्रेसला अपेक्षेप्रमाणे धुळे-नंदूरबारची जागा मिळाली. येथे अमरिश पटेल विजयी झाले. सोलापुरात भाजपापुरस्कृत उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांचा पराभव केला. अकोल्यातून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांनी विक्रमी १५० मतांनी विजय मिळविला. नगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अरुण जगताप यांनी आपली जागा कायम राखली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शशिकांत गाडे यांचा पराभव केला.
घोडेबाजाराचा सर्वांनाच फटका
दरम्यान, शिवसेना-भाजप युतीविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा कागदोपत्री सामना असला, तरी घोडेबाजार आणि दगाफटका सर्वच राजकीय पक्षांना सहन करावा लागला.
विजयी उमेदवाराची यादी
मुंबई : भाई जगताप (कॉंग्रेस), रामदास कदम (शिवसेना)
नागपूर : गिरीश व्यास(भाजपा)
धुळे-नंदूरबार : अमरिश पटेल (कॉंग्रेस)
अहमदनगर : अरुण जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
कोल्हापूर : सतेज पाटील (कॉंग्रेस)
अकोला-बुलढाणा-वाशीम : गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना)
सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजपा)

Short URL: http://vrittabharati.in/?p=26338

Posted by on 11:05 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google