richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गिलगिट भारतात सामील करा

गिलगिट भारतात सामील करा

-वैतागलेल्या पाकी नागरिकांची मागणी,
पेशावर, २ ऑक्टोबर – पाकिस्तान सरकार आणि तेथील सैनिकांच्या अमानुष अत्याचाराचे शिकार ठरत असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानातील जनता कंटाळली असून, आम्हाला भारतात सामील करून घ्या, अशी मागणी त्यांच्याकडून सातत्याने होत आहे.
या प्रांतातील बहुतांश नागरिकांचा कल भारताच्या बाजूनेच आहे. त्यांना स्वत:वर पाकिस्तानी नागरिक असण्याचा ठपका मान्यच नाही, अशी बलवारिस्तान नॅशनल फ्रण्टचे अध्यक्ष अब्दुल हमीद खान यांनी दिली.
पाकच्या उत्तरेकडील गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतावर पाकचे आधिपत्य आहे. मात्र, येथील लोकांसोबत पाक सरकार नेहमीच दुजाभाव करते. पाकचे लष्कर त्यांच्यावर अतोनात अत्याचार करतात. महिला व मुलींचे अपहरण करून, त्यांच्यावर बलात्कार करतात. या नापाक दडपशाहीच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
भारतापासून वेगळे झाल्यानंतर गेल्या ६९ वर्षांपासून आम्ही पाकिस्तानचा अत्याचार सहन करीत आहोत. या देशातील ७२ हजार चौरस किमी भूभागावरील तुरुंगात राहात असल्यासारखी आमची स्थिती आहे.
आमच्याकडे आता दोनच पर्याय आहेत. आम्हाला मतदान करण्याची वेळ आली, तर आमचे मत पाकसाठी नसणार, ते केवळ भारतात राहण्यासाठीच असेल, असे खान यांनी सांगितले. खान सध्या बेल्जिअम येथे राहात असून, तिथेच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या नागरिकांची खदखद व्यक्त केली.
युनायटेड नेशन्स कमिशन फॉर इंडिया ऍण्ड पाकिस्तान ठरावाचे पाकने उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाकमधील राज्यकर्त्यांनी बाल्टिस्तानातील राजकीय कार्यकर्ते, धार्मिक व्यक्ती आणि विद्यार्थ्यांवर दहशतवाद कायद्याखाली खोटे गुन्हे दाखल केले. आम्हाला सातत्याने न्याय नाकारला जातो. कारण बाल्टिस्तान प्रांतात कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. येथे कायदेशीर असे कोणतेही न्यायालय नाही. बाल्टिस्तानातील न्यायालयीन व्यवस्था पाकच्या लष्करी आधिपत्याखाली असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34983

Posted by on 8:44 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google