Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » चाबहार व्यापार क्षेत्रात भारताची मोठी गुंतवणूक : गडकरी

चाबहार व्यापार क्षेत्रात भारताची मोठी गुंतवणूक : गडकरी

Transport Minister Nitin Gadkari, Iran President Hassan Rouhani during a visit to Tehranतेहरान, [२३ मे] – भारत आणि इराण संयुक्तपणे विकसित करणार असलेल्या चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रात भारताने आज सोमवारी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग विकास व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इराण दौर्‍यावर असून, भारताच्या परराष्ट्र धोरणात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या चाबहार बंदराच्या विकासासाठी भारत ही गुंतवणूक करणार आहे. संरक्षण व्यूहरचनेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या चाबहार बंदराची बांधणी आणि देखभाल करण्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये करार झाल्यामुळे भारताला इराणसोबतच अफगाणिस्तान आणि मध्य आशियात आपला राजकीय प्रभाव वाढविण्याची संधी मिळणार आहे.
कांडला आणि चाबहार या बंदरांमधील अंतर नवी दिल्ली आणि मुंबई या दरम्यान असलेल्या अंतरापेक्षाही कमी आहे. यामुळे भारताला इराणमध्ये व्यापारी माल उतरवून नंतर तो अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि रशियात रेल्वे व रस्त्यांच्या नेटवर्कद्वारे पोहोचविणे शक्य होणार आहे. चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रात भारतातर्फे एक लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक होण्याची शक्यता आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
युरियावरील अनुदानासाठी भारताकडून एका वर्षात ४५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतात. चाबहार व्यापार क्षेत्रात या युरियाची निर्मिती करण्यात येऊन तो कांडलामार्गे भारतात आणल्यास खर्च कमी होऊ शकतो. याच अनुषंगाने नाल्को कंपनीकडून येथे ऍल्युमिनियम स्मेल्टर प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. तर, इतर खाजगी व सहकारी खत कंपन्याही येथे युरियाची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर चाबहारमधून अफगाणपर्यंत रेल्वेमार्गाची उभारणीही करण्यात येत आहे. तसेच, चाबहार येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि कांडला पोर्ट ट्रस्ट संयुक्तपणे ६४० मीटर लांबीच्या दोन कंटेनर बर्थची निर्मिती करणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28461

Posted by on May 24 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (285 of 2483 articles)


=सलमा अन्सारी यांची भूमिका= नवी दिल्ली, [२३ मे] - २१ जून रोजी साजरा होणार्‍या आंतरराष्ट्रीय योगदिनी ॐ शब्दाचा उच्चार करावा, ...

×