richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » चेन्नईत महापूर, पंतप्रधान करणार पाहणी

चेन्नईत महापूर, पंतप्रधान करणार पाहणी

chennai floodचेन्नई, [३ डिसेंबर] – तामिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत पावसामुळे २६९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. येथील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून चेन्नईसाठी रवाना झाले आहेत.
त्याचबरोबर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता आज गुरूवारी चेन्नई, कांचीपुरम आणि तिरूवल्लुर येथील पूरग्रस्त परिस्थितीची माहिती घेण्यासाठी या परिसराची हवाई पाहणी करणार आहेत.
बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्‌टा निर्माण झाल्याने मंगळवार रात्रीपासून पून्हा पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या १०० वर्षांत झाला नाही इतका पाऊस एका दिवसात झाला असून तामिळनाडूतील बहुतेक भाग पुराने वेढलेला आहे. येथील टेलिफोन, मोबाइल, रेल्वे सेवा कोलमडून पडली आहे. चेन्नईजवळील ३५ तलावांमधील पाणी पातळीत वाढ झाली असून पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक भागांमध्ये लोक अडकलेले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने ५०० पेक्षा अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. लोकांच्या मदतीसाठी केंद्राकडून लष्कर, नौदल, किनारा रक्षक आणि एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय पथकही कार्यरत आहे.
पावसामुळे चेन्नई विमानतळावर पाणी भरले असून ३० हून अधिक विमाने विमानतळावर अडकली आहे. त्यामुळे चेन्नईची उड्‌डाणे रद्द केली आहे.
दरम्यान, हवामान खात्याने आणखी दोन दिवस पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25941

Posted by on 3:21 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google