Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जपानच्या सहकार्याने धावणार बुलेट ट्रेन

जपानच्या सहकार्याने धावणार बुलेट ट्रेन

  • मुंबई-अहमदाबाद मार्गासाठी करार
  • संरक्षण, अणुऊर्जा करारावरही स्वाक्षरी

narendra modi with shinje abeनवी दिल्ली, [१२ डिसेंबर] – द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेताना भारत आणि जपानने आज शनिवारी बुलेट ट्रेन, संरक्षण आणि अणुऊर्जेसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी केली. यानुसार ९८ हजार कोटी रुपये खर्च करून जपानच्या सहकार्याने पहिल्या बुलेट ट्रेनचे नेटवर्क तयार केले जाणार असून, ही ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात आज शनिवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारासह प्रादेशिक आणि द्विपक्षीय हिताच्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेनंतर मोदी आणि आबे यांनी संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या आर्थिक स्वप्नांविषयीची जाणीव जपानपेक्षा इतर कोणत्याही मित्रराष्ट्राला कदाचितच असेल. शिंझो आबे हे माझे व्यक्तिगत मित्र आहेतच, शिवाय ते भारत-जपान मैत्रीचे शिल्पकारही आहेत.
करारांविषयी माहिती देताना मोदी म्हणाले की, मुंबई-अहमदाबाद या दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्र्रेन सुरू करण्याचा निर्णय ऐतिहासिक असाच आहे. या प्रकल्पाकरिता जपानच्या पंतप्रधानांनी १२ अब्ज डॉलर्सच्या अर्थसाहाय्यासोबतच तांत्रिक सहकार्यही उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे या बुलेट ट्रेनचा प्रवास सुरक्षित आणि जलद गतीचाच राहणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद हे ५५० किलोमीटरचे अंतर यामुळे आठ तासांऐवजी अवघ्या तीन तासांत पूर्ण करता येणार आहे. याशिवाय, नागरी अणुऊर्जा क्षेत्रात झालेला करार वाणिज्य आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्राकरिता अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उभय देशांच्या संबंधांना नव्या उंचीवर नेणाराच आजचा ऐतिहासिक दिवस आहे.
तत्पूर्वी, भारत आणि जपानमधील उद्योजकांच्या परिषदेला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. आपल्या सरकारने सुरू केलेले ‘मेक इन इंडिया’ अभियान जपानमध्ये एक आंदोलन बनले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जपानमधील भारतीयांनी ११ ते १२ अब्ज डॉलर्सचा निधी उभारला असल्याची माहिती मला मिळाली आहे. यावरून दोन्ही देश समान उद्देशाकडे वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट होते.
मोदींची धोरणे बुलेट ट्रेनप्रमाणे : आबे
यावेळी बोलताना शिंझो आबे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आर्थिक धोरणे जपानमधील बुलेट ट्रेनप्रमाणे (शिनकासेन) म्हणजेच वेगवान, सुरक्षित, विश्‍वासार्ह व सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहेत. सशक्त भारत आणि जपानसाठी ही धोरणे अतिशय फायद्याची आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26183

Posted by on Dec 13 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1021 of 2477 articles)


=लक्षावधी कार्यकर्ते हळहळले, मंगळवारी अंत्यसंस्कार= पुणे, [१२ डिसेंबर] - शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणारे, त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि कृषी ...

×