Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जिथे-तिथे नेहरू-गांधी; बापाचा माल आहे का?

जिथे-तिथे नेहरू-गांधी; बापाचा माल आहे का?

=ऋषी कपूर यांचा कॉंगे्रसवर हल्ला=
rishi-kapoor1मुंबई, [१८ मे] – देशावर सुमारे ६० वर्षे राज्य करताना देशभरातील महत्त्वाची ठिकाणे आणि राष्ट्रीय मालमत्तांना केवळ नेहरू-गांधी घराण्यातील नेत्यांचीच नावे देणार्‍या कॉंगे्रसच्या मानसिकतेवर अभिनेते ऋषी कपूर यांनी हल्ला चढविला. ही सार्वजनिक संपत्ती म्हणजे कॉंगे्रसला बापाचा माल वाटला काय, असा संताप व्यक्त करताना या सर्व ठिकाणे व मालमत्तांची नव्याने नामकरण करण्याची मागणी केली.
राजधानी दिल्लीसह काही शहरांमधील विमानतळांना इंदिरा गांधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. दुसरे कोणतेच नाव नव्हते काय? महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी नावे नव्हती काय? कॉंगे्रसची ही मानसिकता अतिशय क्षुद्र आहे, अशी टीका त्यांनी ट्विटरवर केली.
मुंबईतील फिल्मसिटीला दिलीप कुमार, देव आनंद, अशोक कुमार किंवा अमिताभ बच्चन यांची नावे देण्यात यायला हवी होती. पण, तिथेही राजीव गांधी उद्योग असे नाव देण्यात आले. खरे तर, देशातील महत्त्वाच्या ठिकाणांना देशासाठी महत्त्वाचे योगदान देणार्‍या लोकांची नावे द्यायला हवीत. पण, तसे न करता प्रत्येकच ठिकाणांना नेहरू-गांधी घराण्यातील लोकांचीच नावे दिली आहेत. हा प्रकार कसा मान्य करायचा? अलीकडेच मी चंदीगडला होतो, तिथेही राजीव गांधींचे नाव, असे का? आदी सवालही त्यांनी उपस्थित केले.
कोण आहेत ऋषी कपूर : कॉंग्रेस संतप्त
दरम्यान, अभिनेते ऋषी कपूर यांच्या वक्तव्यामुळे कॉंगे्रसचा चांगलाच तिळपापड झाला आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेले बलिदान विसरता येणार नाही. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. दोघांचा सन्मान करणार्‍यांची संख्या मोठी आहे. या नेत्यांच्या योगदानामुळेच विविध संस्थांना त्यांची नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे, नावे बदला म्हणून सांगणारे ऋषी कपूर कोण? भाजपाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत काय, असा सवाल कॉंग्रेसचे नेते पी. सी. चाको यांनी उपस्थित केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28326

Posted by on May 18 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (324 of 2477 articles)


=पंखे, वातानुकूलित यंत्रणा चालविणार= जोधपूर, [१८ मे] - रेल्वेसाठी डिझेल आणि जीवाश्म इंधनाचा वापर वाढत असताना इंधनाची बचत होण्याच्या उद्देशाने ...

×