Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ट्विटरवर नरेंद्र मोदीच अव्वल

ट्विटरवर नरेंद्र मोदीच अव्वल

=१.६१ कोटी फॉलोअर्स=
Modi-2-TWITTERनवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] – जगभरातील भारतीयांच्या पसंतीस उतरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरही बाजी मारली आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदी सर्वाधिक पसंतीचे नेते ठरले असून, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या अवघ्या वर्षभरात १.६१ कोटींच्या घरात पोचली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची माहिती देणारे निवेदन ट्विटरने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. यात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांच्या काळात नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला दहा लाख नागरिकांनी पसंती दिली आहे. सध्या त्यांच्या फॉलोअर्सची संख्या १.६१ कोटी इतकी झाली आहे. मोदी यांनी गेल्या २२ सप्टेंबर रोजी १.५ कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला होता. मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून दिवसेंदिवस त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढतच आहे.
भारतात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणार्‍यांमध्ये चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते अर्थात महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचे १.७८ कोटी आणि शाहरुखचे १.६२ कोटी इतके फॉलोअर्स आहेत. तथापि, जागतिक राजकीय क्षेत्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे सर्वाधिक म्हणजे ६.६१ कोटी फॉलोअर्स आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25637

Posted by on Nov 22 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1187 of 2477 articles)


=फ्रान्सच्या प्रस्तावाला मंजुरी= न्यूयॉर्क, [२१ नोव्हेंबर] - जगभरात प्रचंड हिंसाचार करून क्रूरतेचा कळस गाठत असलेल्या इसिस या जहाल दहशतवादी गटासोबतच, ...

×