richwood
richwood
richwood
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

स्टॉकहॉम, २ ऑक्टोबर – अमेरिकेतील प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ जेफरी सी. हॉल, मायकेल रोसबाश आणि मायकेल डब्ल्यू. यंग यांना आज सोमवारी वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. बहुतांश सजीव प्राणिमात्रांच्या झोपण्याचे आणि जागे होण्याचे चक्र हाताळणार्‍या जैविक घडाळ्यावर मोलाचे संशोधन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.वनस्पती, प्राणी आणि मनुष्य यासारख्या सजीवांची जैविक लय कशी सुरू असते, यावर या तिन्ही शास्त्रज्ञांनी अभ्यास केले.१०८ व्या नोबेल पुरस्काराची येथील कारोलिन्स्का इन्सिट्यूटमधील नोबेल समितीच्या व्यासपीठावरून आज घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांतर्गत तिन्ही शास्त्रज्ञांचे नाव असलेले नोबेलचे मानचिन्ह तसेच ८ लाख २५ हजार पौंडांची रक्कम त्यांच्यात विभागून देण्यात येणार आहे.
सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र या क्षेत्रात या तिघांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. या घड्याळरूपी चक्रामुळे सजीवांमधील झोपेचे प्रकार, खाण्यापिण्याच्या पद्धती, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्तदाब यांचे नियमन होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. सजीवांमधील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्यात बदल झाल्यास त्याचा सजीवांवर परिणाम होतो. यासाठी उदाहरणादाखल त्यांनी एखादे जेट विमान जोराचा आवाज करीत आपल्या डोक्यावरून गेल्यानंतर होणार्‍या अवस्थेचा दाखला दिला. या तिन्ही शास्त्रज्ञांच्या पथकाने सजीवांमधील अंतर्गत घडाळ्यातील विविध प्रकारचे जनुक आणि प्रथिनांचा शोध लावला. हॉल हे निवृत्त झाले असले, तरी ते अजूनही आपला बराच वेळ वालथम येथील ब्रॅण्डिज विद्यापीठातील संशोधनासाठी देतात. रोसबाश हेदेखील याच विद्यापीठात प्राध्यापक आहेत, तर यंग हे न्यू यॉर्क येथील रॉकेफेलर विद्यापीठात संशोधनाचे काम करीत आहेत.
आज भौतिकशास्त्राचा नोबेल
भौतिकशास्त्रातील नोबेलची घोषणा उद्या मंगळवारी, तर बुधवारी रसायनशास्त्रातील नोबेलची व शुक्रवारी शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे.  (वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34977

Posted by on 8:16 pm. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google