Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » देशाला मिळाल्या महिला लढाऊ वैमानिक

देशाला मिळाल्या महिला लढाऊ वैमानिक

=इतिहास घडला…=
manohar-parrikar with first batch of 3 women pilots entering into combat role in Indian Air Forceहैदराबाद, [१८ जून] – आजचा दिवस केवळ देशासाठीच नव्हे, तर स्त्रीशक्तीसाठीही ऐतिहासिक असाच राहिला. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या तीन महिलांच्या रूपात देशाला आज शनिवारी लढाऊ वैमानिक मिळाल्या. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिक म्हणून त्या दाखल झाल्या.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुंडीगल येथील अकादमीत आयोजित करण्यात आलेल्या शानदार सोहळ्यात या तीन महिला लढाऊ वैमानिकांच्या पहिल्या तुकडीने हवाई दलात प्रवेश केला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पर्रीकर उपस्थित होते. आपल्या देशात महिलांना प्रथमच लढाऊ विमानांच्या वैमानिकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिल्या जावा असाच आहे. आगामी काही वर्षांतच सशस्त्र दलांमधील स्त्री-पुरुष विषमता पूर्णपणे नष्ट करण्यावर आपला भर राहणार आहे, असे प्रतिपादन पर्रीकर यांनी यावेळी केले.
काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी राहू शकतात आणि म्हणूनच सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने पावले उचलण्यात येणार आहेत, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.
आम्ही उत्साहित आहोत
लढाऊ वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात समावेश झाल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करताना, अवनी, भावना आणि मोहना म्हणाल्या की, आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. आता प्रत्यक्ष जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही अतिशय उत्साहित आहोत.
आता प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा
या तिन्ही वैमानिकांना आता प्रशिक्षणाच्या तिसर्‍या टप्प्यासाठी कर्नाटकच्या बिदर येथे पाठविण्यात येणार आहे. तिथे त्यांना हॉक या प्रगत जेट विमानाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्या थेट सुपरसॉनिक लढाऊ विमानातून भरारी घेणार आहेत.
संरक्षण मंत्री पर्रीकर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात समाविष्ट करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर सहा महिला कॅडेट्‌स प्रशिक्षणासाठी समोर आल्या होत्या. तथापि, त्यातील केवळ तीन महिलांचीच नियुक्ती करण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28650

Posted by on Jun 19 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (217 of 2477 articles)


=उत्तराखंड नैसर्गिक आपत्तीला तीन वर्ष पूर्ण= नवी दिल्ली, [१८ जून] - मर्यादा लक्षात घेऊन विवेकाचा वापर करत विकासाचे धोरण आखले ...

×