Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पंतप्रधानांनी दिला समानतेचा संदेश

पंतप्रधानांनी दिला समानतेचा संदेश

=भाजपा मुख्यालयात ‘दिवाळी मिलन’, पत्रकारांसोबत काढल्या सेल्फी=

New Delhi : Prime Minister Narendra Modi being greeted by the BJP President Amit Shah during the Diwali Mangal Milan programme at BJP headquarters in New Delhi on Saturday. PTI Photo by Shahbaz Khan (PTI11_28_2015_000081b)

नवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] – भाजपा मुख्यालयात आज शनिवारी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रम थाटात आणि उत्साहात पार पडला. कुठलेही निर्बंध नसलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक पत्रकाराजवळ जाऊन मुक्तपणे संवाद साधला. यावेळी त्यांनी निष्पक्ष आणि समानतेचा संदेश दिला.
आपल्या देशात साजरे केले जाणारे सर्वच सण समाजाला नवी प्रेरणा देत असतात, असे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, दीपपर्वाचा हा सणही आपल्याला नवी प्रेरणा देणाराच आहे. या देशात राहणार्‍या प्रत्येक जाती-धर्मातील लोक हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. त्यात कुठलाही पक्षपात नसतो. यामुळे एकता आणि समानतेचे मूल्यही बळकट होतात.
कुंभ मेळ्यासह अनेक सण व उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते, याकडे लक्ष वेधताना, आपल्या भारतीय समाजात हे सणच फार मोठी शक्ती आहे. समाजाला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि नवा उत्साह प्राप्त करून देतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. या सणांच्या सामाजिक आणि आर्थिक पैलूंचे जर आपण विश्‍लेषण केले, तर त्यातून अनेक कथा बाहेर येतील. उदाहरणच द्यायचे झाल्यास, कुंभमेळ्यात गंगा नदीच्या तिरावर विविध जाती-धर्मातील लाखो लोक एकत्र येतात. युरोपातील एखादा लहान देशच जणू तिथे आकारास आला आहे, असा भास होतो, असेही ते म्हणाले.
आपले छोटेखानी भाषण संपविल्यानंतर पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांकडे वळले. प्रत्येकांजवळ जाऊन त्यांनी हस्तांदोलन केले. अनेकांसोबत सेल्फीही काढल्या. यावेळी कुठलेही सुरक्षा निर्बंध नव्हते. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षीही अशाच प्रकारचा दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळाले होते. पंतप्रधान म्हणाले की, काही व्यस्त कार्यक्रमांमुळे यावेळी दिवाळी मिलन कार्यक्रम उशिरा आयोजित करण्यात आला. आता जर तो आयोजित केला नसता, तर आपल्याला थेट ख्रिसमसपर्यंत प्रतीक्षा करावी लागली असती. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय लोकशाहीकरिता हे वर्ष अतिशय महान असल्याचे मत व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25818

Posted by on Nov 29 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1126 of 2477 articles)


=राजनाथसिंह यांचा विश्‍वास= नवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] - संपुआ सरकारच्या काळात मृतप्राय झालेल्या अर्थव्यवस्थेला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने ...

×