Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना झाले. त्यांचा हा दौरा चार दिवसांचा असून, या दौर्‍यात ते पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलॅण्ड या देशांना भेटी देणार आहेत.
या तिन्ही देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर पंतप्रधानांचा भर राहणार आहे. दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात ते पोर्तुगालला भेट देणार आहेत. पोर्तुगालचे पंतप्रधान ऍन्टोनिओ कोस्टा यांच्यासोबत पंतप्रधान मोदी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय अशा विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
पोर्तुगालची भेट संपवून ते २६ जून रोजी अमेरिकेला येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच विदेशी पंतप्रधान राहणार आहेत. त्यानंतर ते नेदरलॅण्डचा दौरा करणार आहेत. दोन्ही देशांमधील राजनयिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नेदरलॅण्डने मोदी यांच्याकरिता विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्‍यात अमेरिका विशेष महत्त्वाचे केंद्र राहणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीत दहशतवाद आणि एच १ बी व्हिसाच्या नियमात झालेल्या बदलांवर ते चर्चा करणार आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी
मोदी आणि ट्रम्प यांची २६ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता भेट होणार आहे. त्यांची ही भेट सुमारे पाच तासांची असेल. त्यानंतर ते संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित करतील. या दिवसाचा शेवट रात्री व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष भोजन समारंभाने होणार आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये भोजन घेणारे मोदी पहिलेच विदेशी पंतप्रधान ठरणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=34806

Posted by on Jun 25 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (48 of 2477 articles)


मुंबई, २४ जून - शाळेऐवजी पालक संघटनेशी करारबद्ध असणार्‍या खासगी वाहनांनाही यापुढे ‘स्कूल बस’ परमिट दिले जाऊ शकते, अशी माहिती राज्य ...

×