Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » पंतप्रधान मोदी यांचे लंडनमध्ये भव्य स्वागत

पंतप्रधान मोदी यांचे लंडनमध्ये भव्य स्वागत

  • बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आज उद्‌घाटन
  • दाऊदच्या मालमत्तेची माहिती सोपविणार

modi grand welcome in london gard of honourनवी दिल्ली/लंडन, [१२ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिटनच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर आज गुरुवारी लंडनमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. गेल्या वर्षी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच ब्रिटन दौरा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन ते करणार आहेत. तसेच, अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या ब्रिटनमधील सुमारे १५०० कोटी रुपयांच्या संपत्तीची परिपूर्ण माहिती असलेला अहवाल भारतातर्फे यावेळी ब्रिटन सरकारला सोपविण्यात येणार आहे.
भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक संबंधासह द्विपक्षीय हितसंबंध आणखी बळकट करण्यासोबतच, ब्रिटनमधील गुंतवणूकदारांना भारतात आकर्षित करण्यावर पंतप्रधानांचा भर राहणार आहे. तसेच दाऊदची आर्थिक नाकेबंदी करण्याची रणनीतीही भारत सरकारने आखली आहे.
तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी पंतप्रधान दोन देशांच्या पाच दिवसांच्या दौर्‍यावर रवाना झाले होते. उभय देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी माझा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे, असे ट्विट त्यांनी केले. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनीही ट्विटरच्या माध्यमातून मोदी यांचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारने अलीकडेेच खरेदी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सुमारे दहा वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा ब्रिटन दौरा आहे.
नरेंद्र मोदी उद्या शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत. लंडन येथे असताना डॉ. आंबेडकर ज्या वास्तूत राहिले, ती वास्तू महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतली असून, पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे स्मारकात रूपांतर केले जाणार आहे. ब्रिटन दौरा आटोपून पंतप्रधान मोदी ‘जी-२०’ राष्ट्रसमुहाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी तुर्कस्थानला रवाना होणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25410

Posted by on Nov 13 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1261 of 2483 articles)


=भाजपाचा सवाल, सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी= नवी दिल्ली, [१२ नोव्हेंबर] - ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुगीं यांची हत्या कर्नाटकातच झाली असताना, ...

×