richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

=हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार • मध्यप्रदेशातही बंदी
=दीपिका, भन्साळींच्या १५० पुतळ्यंाचे सामूहिक दहन,

Demonstrators Bollywood Padmavati Bengaluru Protest

Demonstrators Bollywood Padmavati Bengaluru Protest

भोपाल, २० नोव्हेंबर –

वादाच्या कचाट्यात सापडलेल्या पद्मावती सिनेमावर मध्यप्रदेशात बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतला आहे. यामुळे दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या संजय भन्साळींच्या या चित्रपटाला चांगलीच झळ बसणार असल्याचे दिसत आहे.
राजपूत समाजाच्या नेत्यांनी शिवराज सिंह यांच्याकडे आपली बाजू मांडली. हा चित्रपट राजपूत समाजाचा अपमान करत असल्याचा आक्षेप त्यांनी आपल्या बाजूत मांडला. या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मध्यप्रदेशात पद्मावती दाखवण्यात येणार नाही, असे चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
तर दुसरीकडे पद्मावती सिनेमाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सेन्सॉर बोर्डाने अजून सिनेमाला प्रमाणपत्र दिलेले नसताना बोर्डाच्या कामात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे म्हणत मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे.
निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाची परवानगी न घेताच गाणे रिलीज केले. गाण्यात एका सन्मानित राणीला नृत्यांगना दाखवण्यात आले, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता. मात्र ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती, असे निर्मात्यांनी सांगितले.
दिवसेंदिवस या चित्रपटाला विरोध वाढत असल्याचे सध्याचे चित्र आहे. बरेलीतील अखिल भारतीय क्षत्रीय महासभेच्या युवा शाखेने दीपिकाला जिवंत जाळणार्‍या व्यक्तीला एक कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. दामोदर पार्क येथे आयोजित सभेत युवा क्षत्रीय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भुवनेश्‍वर सिंह यांनी ही घोषणा केली. यावेळी पद्मावती चित्रपटाला करण्यात आलेल्या विरोधात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय भन्साळी यांच्या १५० पुतळ्याचे सामूहिक दहन करण्यात आले. या वेळी भुवनेश्‍वर सिंह म्हणाले की, आगीत जळणे काय असते याचा अनुभव दीपिकाला दिला जाईल.
हरियाणामधील भाजपाचे प्रसार प्रमुख अम्मू यांनी देखील स्पष्ट शब्दात पद्मावती चित्रपटाला विरोध केला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि संजय भन्साळी यांचे डोके कापून आणणार्‍याला १० कोटींचे बक्षीसच त्यांनी जाहीर केले आहे. याचवेळी त्यांनी चित्रपटात अल्लाऊद्‌दीन खिलजीची भूमिका करणार्‍या रणवीर सिंगचे पाय तोडण्याचीही धमकी दिली.
दीपिका आणि भन्साळी यांचे शिर कापणार्‍याला आपल्याच समाजातील लोकांकडून १० कोटी गोळा करून देण्यात येतील असे सूरजपाल अम्मू बोलले आहेत. इतकेच नाही तर, जो कोणी संजय भन्साळी यांचे डोके कापेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आपण घेऊ अशीही घोषणा त्यांनी केली आहे. रणवीर सिंह याने एका मुलाखतीत आपला भन्साळींना पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. यावर बोलताना त्यांनी रणवीर सिंगला धमकी देत, आपले शब्द मागे घेतले नाहीत तर त्याचे हातपाय तोडण्यात येतील अशी धमकी दिली आहे.
हा सिनेमा आधी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार होता. परंतु चित्रपटावरून झालेल्या वादामुळे प्रदर्शनाची तारीख अनिश्‍चित पुढे ढकलण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सेन्सॉर बोर्डाला हा चित्रपट दाखवण्याआधी विविध प्रसारमाध्यमांना तो दाखवण्यात आला होता. यावर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी टीका केली आहे. तसेच, अर्जात त्रुटी असल्याचे दाखवत सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला आहे.
सरकार गप्प का?
नवी दिल्ली : या वादात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याला मिळत असलेल्या धमक्या रोखण्याची जबाबदारी सरकारची नाही का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. सरकार ‘पद्मावती’च्या वादावर गप्प का आहे, असेही बेनेगल यांनी विचारणा केली आहे. लोक उघडपणे शिर कापण्याची आणि त्यासाठी पैशांची ऑफर करत आहेत. मात्र, हे रोखण्यासाठी राज्य सरकार काही करताना दिसत नाही. गृह विभाग आणि पोलिसांकडून सुरक्षा मिळाली पाहिजे. जर मुख्यमंत्री आणि सरकारी सदस्यच असा दृष्टिकोण ठेवतील तर प्रशासन काय करेल? राष्ट्रीय टेलिव्हिजनवर उघडपणे जीवे मारण्याची धमकी देणार्‍यांविरोधात सरकार कारवाई का करत नाही? (वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=35004

Posted by on 11:24 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google