richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, मराठवाडा, महाराष्ट्र » परळीत गोपीनाथगड स्मारकाचे लोकार्पण

परळीत गोपीनाथगड स्मारकाचे लोकार्पण

बीड, [१२ डिसेंबर] – परळीतील १८ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या ‘गोपीनाथगड’ या स्मारकाचे आज शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मित्र पक्षातील अनेक नेते उपस्थित होते.
पांगरी येथील वैद्यनाथ कारखान्याच्या परिसरात १८ एकर शेतजमिनीवर हे स्मारक उभारण्यात आले आहे. गेल्या वर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. स्मारकाच्या कामासाठी पश्‍चिम बंगालमधून कारागीर मागवण्यात आले होते. या परिसरात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा तब्बल २२ फुटी पंचधातूचा पुतळा उभारला आहे. या स्मारकाचा आज लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26164

Posted by on 4:45 am. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मराठवाडा, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google