richwood
richwood
richwood
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » पाकचा ‘मित्र’ दर्जा काढून घ्या!

पाकचा ‘मित्र’ दर्जा काढून घ्या!

=अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात विधेयक सादर,
वॉशिंग्टन, २३ जून –
दहशतवादविरोधी लढ्यातील महत्त्वाचा मित्र म्हणून पाकिस्तानला जो दर्जा देण्यात आला आहे, तो आता काढून घेण्यात यावा, अशा आशयाचे विधेयक अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात सादर करण्यात आले आहे.
दहशतवादविरोधी लढ्यासाठी पाक अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि लष्करी मदत प्राप्त करतो. पण, सत्यता अशी आहे की, हा देश या लढ्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे, असा आरोप या विधेयकात करण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते टेड पो आणि डेमॉक्रॅटिक पार्टीचे नेते रिक नोलान यांनी हे विधेयक सादर केले आहे. पाकला गैर-नाटो सदस्य देशांमध्ये महत्त्वाचा मित्र असा दर्जा २००४ मध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी बहाल केला होता.
अफगाणिस्तान आणि भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक अमेरिकन नागरिकांचा बळी गेला आहे. यातील बहुतांश हल्ले पाकिस्तानच्या भूमीत आश्रयास असलेल्या अतिरेक्यांनीच केले असल्याने अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने माखले आहेत. यासाठी पाकमधील सत्ताधार्‍यांना जबाबदार ठरवायलाच हवे, असे पो यांनी सभागृहात सांगितले.
अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या ओसामा बिन लादेनला आश्रय देण्याचे आणि अफगाणमध्ये अमेरिकन हित सातत्याने धोक्यात आणणार्‍या तालिबान्यांना पाठीशी घालण्याचे काम पाकने वारंवार केले आहे. त्यामुळे दहशतवादविरोधी लढ्यात तो अमेरिकेचा जवळचा मित्र ठरूच शकत नाही. अशा स्थितीत पाकसोबतची मैत्री संपुष्टात आणणे हाच एकमेव पर्याय असल्याचेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34789

Posted by on 12:43 am. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google