Home » छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » पाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा!

पाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा!

=जम्मूत संतप्त नागरिकांची निदर्शने,
वृत्तसंस्था
जम्मू, ८ जून –
पाकिस्तानला आता चिरडायलाच हवे आणि सुरक्षा स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी संपूर्ण जम्मू-काश्मीर भारतीय लष्कराच्या स्वाधीन करण्यात यावे, अशी संतप्त मागणी अनेक संघटनांनी आज शुक्रवारी केली.
जम्मू पश्‍चिम असेम्बली मूव्हमेंटचे अध्यक्ष सुनील डिम्पल यांच्या नेतृत्वात हजारो लोक आज रस्त्यावर उतरले होते. यातील अनेकांच्या हातात ‘पाकला चिरडून टाका’ अशा आशयाची फलके होती. या वर्षभरात पाकी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात व तोफांच्या मार्‍यात ४७ नागरिक ठार आणि १३० जण जखमी झाले. निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्‍या पाकला जगाच्या नकाशावर राहण्याचा अधिकारच नसल्याने हा देश चिरडून टाकण्यात यावा आणि फुटीरतावादी मानसिकतेच्या लोकांमुळे ढासळलेली कायदा व सुव्यवस्था स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्याची सूत्रे लष्कराच्या स्वाधीन करण्यात यावी, असे सुनील डिम्पल यांनी आंदोलनाच्या काळात पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाकच्या सैनिकांनी गोळीबार करून सीमेवरील गावांमध्ये, तर आपल्या अतिरेक्यांच्या माध्यमातून काश्मीर खोर्‍यात दहशत निर्माण केली आहे. असंख्य निष्पाप तरुणांची दिशाभूल करून पाकने त्यांना अतिरेकी बनविले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह काश्मीर भेटीवर असल्याने लोकांचा संताप आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=35143

Posted by on Jun 10 2018. Filed under छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2 of 2477 articles)


=जमात-उद-दावा लढणार २०० जागा, वृत्तसंस्था लाहोर, ९ जून – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदची जमात-उद-दावा ही ...

×