Home » आंतरराष्ट्रीय, आफ्रिका, छायादालन, ठळक बातम्या » पॅरिसनंतर आता मालीत हल्ला

पॅरिसनंतर आता मालीत हल्ला

  • १७० लोकांना ओलिस ठेवले, तिघांची हत्या
  • सुरक्षा दलाचा हॉटेलला वेढा

mali-attack-isisबामको, [२० नोव्हेंबर] – फ्रान्सच्या पॅरिस शहरावरील हल्ल्याचे संतप्त पडसाद अजूनही कायम असतानाच, दहशतवाद्यांनी आज शुक्रवारी आफ्रिकेतील माली देशाची राजधानी बामको येथील एका पंचतारांकित हॉटेलवर हल्ला केला. केवळ दोन अतिरेक्यांनी अत्याधुनिक बंदुकांच्या जोरावर १७० लोकांना ओलिस ठेवले असून, यातील तिघांना गोळ्या घालून ठार केले, तर सुरक्षा दलाच्या जवानांनी आतापर्यंत २० लोकांना सुरक्षित मुक्त केले आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या रॅडिसन ब्ल्यू या आलिशान हॉटेलात दोन दहशतवाद्यांनी प्रवेश केला आणि हॉटेलातील कर्मचारी व अतिथींना ताब्यात घेऊन एका खोलीत बंद केले. याबाबतची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी हॉटेलला घेराव दिला आणि अतिरेक्यांना शरण येण्यास सांगितले. पण, तसे न करता अतिरेक्यांनी तिघांना गोळ्या घालून, त्यांचे मृतदेह बाहेर फेकले. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सातव्या मजल्यावर सुरू होता.
या अतिरेक्यांनी ज्या कारमधून हॉटेलात प्रवेश केला, त्या कारवर दूतावासासारखी नंबर प्लेट असल्याने त्यांना सुरक्षा यंत्रणांनी अडविले नाही. ज्या लोकांना अतिरेक्यांनी ओलिस ठेवले, त्यांना कुराणातील आयत म्हणण्यास सांगितले. ज्यांनी ते म्हटले, त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. तथापि, सुरक्षा जवानांनीच आतापर्यंत २० जणांची मुक्तता केली असल्याचा दावा सरकारी सुरक्षा संस्थांनी केला आहे.
ओलिस असलेल्या लोकांमध्ये आफ्रिकेतील धनाढ्य लोकांचा आणि ठार झालेल्यांमध्ये फ्रान्स व बेल्जियमच्या नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आहे. ओलिसांमध्ये हॉटेलच्या ३० कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोर अल्ला-ओ-अकबर असे ओरडत होते. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाच सदस्यांसह १३ जण ठार झाले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये बामको शहरात सुरक्षा संस्थांनी अनेक दहशतवादी हल्ले परतावून लावले आहेत. दरम्यान, आजच्या हल्ल्यामागे मॅकिना लिबरेशन फ्रंटचा हात असावा, असा दावा करण्यात आला आहे. स्थानिक मीडिया या संघटनेला न्यू बोको हराम या नावाने ओळखते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25597

Posted by on Nov 21 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आफ्रिका, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आफ्रिका, छायादालन, ठळक बातम्या (1207 of 2483 articles)


=नवा व्हिडीओ जारी= वॉशिंग्टन, [२० नोव्हेंबर] - इराक आणि सीरियासह अनेक देशांमध्ये दहशतवादी कारवाया असलेल्या आणि गेल्या आठवड्यात फ्रान्सची राजधानी ...

×