Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » प्रणव मुखर्जींचा आजपासून चीन दौरा

प्रणव मुखर्जींचा आजपासून चीन दौरा

Pranab Mukherjee during the ceremonial departure to the visit of China at Rashtrapati Bhavanनवी दिल्ली, [२३ मे] – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या मंगळवारी चीनच्या चार दिवसांच्या दौर्‍यावर रवाना होणार आहेत. आशियातील दोन महासत्ता असलेल्या भारत आणि चीनमधील संबंध आणखी मजबूत करण्यावर राष्ट्रपतींचा भर राहणार आहे.
प्रणव मुखर्जी या भेटीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान ली. केकियांग आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून, जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीत ते जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरला बचाव करण्याची चीनची भूमिका आणि अण्वस्त्र पुरवठादार गटात प्रवेश करण्यासाठी भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करावी, या चीनच्या भूमिकेचा मुद्दा उपस्थित करणार आहेत.
यापूर्वी, प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्राध्यक्षा म्हणून २०१० मध्ये चीनचा दौरा केला होता. प्रणव मुखर्जी यांनी वेगवेगळ्या पदांवर असताना अनेकदा चीनला भेट दिली असली, तरी राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच चीन दौरा राहणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28442

Posted by on May 24 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (284 of 2474 articles)


=७० जागांवरील हातचा विजय हिरावला= कोलकाता, [२३ मे] - पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ तीन जागांवरच विजय मिळविता आला ...

×