Home » छायादालन, ठळक बातम्या, राजस्थान, राज्य » प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतरच ‘त्याने’ घातल्या चपला

प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतरच ‘त्याने’ घातल्या चपला

=अशीही मोदीभक्ती=
modi with Balwant Kumawat who weared footware after modi become pmजयपूर, [२२ ऑगस्ट] – पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ देशातच नाही, तर विदेशातही प्रचंड लोकप्रिय आहेत, याची अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आले आहेत. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. पंतप्रधान मोदी यांची भेट होत नाही, तोपर्यंत पायात चपला न घालण्याचा आणि अनवाणीच चालण्याचा निर्धार करणार्‍या एका तरुणाला अखेर मोदी यांचे साक्षात दर्शन झाले आणि प्रतिज्ञा पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करीत त्याने तब्बल दोन वर्षांनंतर आपल्या पायात चपला घातल्या.
राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील भैलवाडा तालुक्यात राहणार्‍या या तरुणाचे नाव बलवंत कुमावत असून, शुक्रवारी जयपूर येथे त्याची पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. त्याने दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधानपदी विराजमान होत नाहीत आणि त्यांची प्रत्यक्ष भेट होत नाही, तोपर्यंत अनवाणी चालण्याची प्रतिज्ञा घेतली होती.
बलवंतची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांनी त्याला आपली ऊर्जा देशासाठी काहीतरी सकारात्मक करण्यात खर्ची घालण्याचा सल्ला दिला. कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होतील, असे संकल्प यापुढे करू नका, असा प्रेमळ सल्लाही मोदी यांनी त्याला दिला.
यानंतर ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देताना मोदी यांनी म्हटले आहे की, या तरुणाच्या प्रतिज्ञेविषयी मला कळल्यानंतर त्याची भेट घेण्याचा निर्णय मी घेतला. त्यानुसार, त्याची भेट घेतली. माझ्या भेटीने तो फारच आनंदी दिसत होता. त्याने माझ्यासाठी दोन वर्षे त्रास सहन केला, याचे मला दु:ख आहे. माझ्यासाठी यापुढे असा प्रकार कुणीही करू नये, अशी माझी नम्र विनंती आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23658

Posted by on Aug 23 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजस्थान, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजस्थान, राज्य (1520 of 2477 articles)


 द्विपक्षीय चर्चेत तिसर्‍या पक्षाला स्थान नाही  भारताने पाकिस्तानला सुनावले  ... ही तर ऊफा अजेंड्यापासून पळवाटच नवी दिल्ली/इस्लामाबाद, [२१ ऑगस्ट] ...

×