Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » फेसबुककडून हॅकरला १० लाखाचं बक्षीस

फेसबुककडून हॅकरला १० लाखाचं बक्षीस

Anand-Prakash-fbनवी दिल्ली, [९ मार्च] – फेसबुकच्या लॉग इन सिस्टममध्ये ‘बग’ शोधून काढणार्‍या बंगळुरू येथील हॅकर आनंद प्रकाशला फेसबुक कंपनीने दहा लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आनंद प्रकाशनं फेसबुकच्या सिक्युरिटी टीमला २२ फेब्रुवारीला ‘बग’ शी निगडीत एक अहवाल पाठवला होता.
आनंद प्रकाश हा ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून काम करतो. त्याने फेसबुकच्या सिक्युरिटी टीमला २२ फेब्रुवारी रोजी या ‘बग’बाबत माहिती दिली होती. त्यानंतर हा बग लगेचच फिक्स करण्यात आला. २ मार्च रोजी फेसबुकनं त्याला १० लाखाचं बक्षीस दिलं.
आनंद प्रकाश हा भादरा, राजस्थानमध्ये राहणारा असून त्याने वेल्लूर इंस्टिट्‌यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं आहे. आजवर त्याने बग शोधून १ कोटी कमावले आहेत. फेसबुकनं बग शोधण्यासाठी आनंदला चौथा क्रमांक दिला आहे.
दरम्यान, यूजर्ससाठी ‘बग’ हा धोक्याचा आहे. ‘बग’ लॉग इन सिस्टिममध्ये शिरल्यास हॅकर्स थेट तुमच्या अकाउंटमध्ये घुसखोरी करू शकतात. त्याद्वारे तुमचे मेसेजेस, फोटो, डेबिट – क्रेडिट कार्ड डिटेल्सची माहिती चोरू शकतात. आनंदनं आपल्या ब्लॉगमध्ये लिहिल आहे, की फेसबुकनं ही मोठी समस्या शोधून या समस्येवर कामही सुरू केलं आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27159

Posted by on Mar 10 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (721 of 2477 articles)


=पाच कोटींचा दंडही ठोठावला= नवी दिल्ली, [९ मार्च] - यमुना नदीच्या किनार्‍यावर ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्यातर्फे ...

×