Home » छायादालन, ठळक बातम्या, बंगाल, राज्य » बंगालमध्ये मॉं, माटी, मानुषची जागा मृत्यू, मनीने घेतली

बंगालमध्ये मॉं, माटी, मानुषची जागा मृत्यू, मनीने घेतली

=नरेंद्र मोदी यांचा घणाघात=
PM Modi addresses a rally in Siliguri, West Bengalसिलीगुडी, [७ एप्रिल] – पश्‍चिम बंगालमधील अलीपूर जिल्ह्यात गुरुवारी आयोजित निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूलच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मागच्या निवडणुकीत ‘मॉं, माटी और मानुष’ हा नारा आम्ही ऐकला होता. पण, प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यातील जनतेला फक्त ‘मौत, मौत आणि मौत’ तसेच मनी… मनी… हेच ऐकायला मिळाले.
नारदा स्टिंग ऑपरेशनची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, ज्या लोकांनी मॉं, माटी और मानुषबाबत गोष्टी केल्या तेच लोक आज मनी म्हणजे पैसा घेताना पकडले गेले आहेत.
विकासाच्या गोष्टी करणारे तृणमूल व डावे पक्ष यांचे आज सर्व लक्ष बलात्कार, भ्रष्टाचार आणि हिंसाचार याकडे असल्याचाही आरोप मोदी यांनी आपल्या भाषणातून केला.
ममताला लक्ष्य करीत त्यांनी सांगितले की, आपण जेव्हा दिल्लीत बैठक बोलावतो तेव्हा ममता दीदी त्या बैठकीला यायला घाबरतात, पण दिल्लीत सोनिया गांधी यांची आवर्जून भेट घ्यायला जातात. हे काय नाते आहे, आपल्याला तर कळलेच नाही, तुमच्या तरी लक्षात आले का, अशी विचारणाही मोदी यांनी, भाषणादरम्यान संवाद साधण्याच्या आपल्या शैलीत उपस्थितांना केली.
कोलकातातील पूल दुर्घटनेचा उल्लेख करताना मोदी म्हणाली की, पूल पडल्यानंतर ममता दीदी पहिल्यांदा घटनास्थळावर पोहोचल्या आणि या बांधकामाचा ठेका आधीच्या डाव्या सरकारने दिल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पूल कोसळण्याच्या घटनेला ‘ऍक्ट ऑफ गॉड’ असेही म्हटले गेले. ही घटना तशी नसून ‘ऍक्ट ऑफ फ्रॉड’ असल्याचे मोदींनी सभेला उपस्थित मतदारांच्या लक्षात आणून दिले. या सभेनंतर पंतप्रधानांनी आसनसोल आणि गोसाईपूर येथेही प्रचार सभा घेतली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27755

Posted by on Apr 8 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, बंगाल, राज्य (511 of 2477 articles)


नवी दिल्ली, [७ एप्रिल] - देशभरात गाजत असलेल्या पनामा पेपर्स प्रकरणामध्ये अनेक नामवंत व्यक्तींसह आता सैफ अली खान, त्याची पत्नी ...

×