Home » क्रीडा, छायादालन » बलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय

बलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय

brazil-vs-argentinaबेलो होरिझोन्टो , [१४ नोव्हेंबर] –  विश्‍व करंडक पात्रता फेरींच्या फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य ब्राझील संघाने अर्जेटिनाचा ३-० गोलने पराभव केला. पराभूत संघात विख्यात खेळाडू लियोनेल मेस्सीचा समावेश होता. या पराभवाकडे बघता अर्जेटिनाला फिफा विश्‍व करंडकाच्या पात्रतेचा मार्ग बंद होण्याची दाट भीती आहे.
कोन्टिनियो, नेमार आणि पॉलिन्योन यांनी ब्राझीलकडून प्रत्येकी एक गोल केला. या विजयासह ब्राझीलने २४ गुणांसह गटात आघाडी घेतली आहे. पराभूत अर्जेटिना संघ गटात सहाव्या स्थानावर माघारला आहे. दक्षिण अमेरिकेतून गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकावर राहणार्‍या संघांनाच पुढील विश्‍व करंडकात भाग घेण्याची संधी मिळू शकते हे येथे विशेष. विश्‍व करंडकासाठी धडक द्यावयाची असल्यास गटात अर्जेटिनाला किमान पाचवे स्थान मिळवावे लागणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=29374

Posted by on Nov 15 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन (57 of 392 articles)


=माजी डीजीएमओचा गौप्यस्फोट • कॉंग्रेसचा खोटारडेपणा उघड= नवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] - संपुआच्या कार्यकाळातही गुलाम काश्मिरात धडक लष्करी कारवाई (सर्जिकल ...

×