richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतीय अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे कारस्थान

भारतीय अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे कारस्थान

=स्वदेशी जागरण मंचाच्या राष्ट्रीय संयोजकांचा इशारा=
Swadeshi Jagaran Manch jodhpur sammelanजोधपूर, [२९ डिसेंबर] – वर्तमान परिस्थितीत आर्थिक सुधारणांच्या नावावर भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णपणे नष्ट करण्यात येत असल्याचे मत स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संयोजक अरुण ओझा यांनी येथे व्यक्त केले. येथील लालसागरस्थित हनवंत आदर्श विद्या मंदिरात आयोजित स्वदेशी जागरण मंचाच्या तीन दिवसीय राष्ट्रीय संमेलनाच्या समारोप सत्रात ते बोलत होते.
ओझा पुढे म्हणाले की, वैश्‍विकीकरण, आर्थिक सुधारणा अशी मोठमोठी नावे देऊन भारतीय जनमानसाला विचलित करण्यात येत आहे. बाजारीकरणाच्या नावावर बहुराष्ट्रीय कंपन्यांना जे हवे आहे, त्याप्रमाणे आम्हाला विविध वस्तू खायला-प्यायला देण्यात येत आहेत. ६० च्या दशकापूर्वी खाद्य तेल व तूप याबाबत देशात कोणतीही चिंता नव्हती. मात्र विदेशी कंपन्यांनी वेगवेगळ्या रोगांची नावे सांगून त्यात बदल केला. परिणामी तीळ, भूईमूग व नारळ यांच्यांशी संबंधित तेल बनवणारे कुटिर उद्योग आज नष्ट होत आहेत. त्यामुळेच आर्थिक क्षेत्रात स्वदेशी संरचनेला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न स्वदेशी जागरण मंच करीत आहे.
विदेशी गुंतवणुकीतून किती धन प्राप्त झाले याचा देशातील आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी लेखाजोखा दिला आहे, पण किती धन देशाबाहेर जात आहे याबाबत कोणतीच माहिती देण्यात येत नसल्याकडे लक्ष वेधून ओझा म्हणाले की, स्वदेशी जागरण मंचातर्फे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार जेथे गुंतवणुकीतून एक डॉलर येत आहे, त्या तुलनेत तीन डॉलर देशाबाहेर जात आहेत. त्यामुळे देशासाठी नवीन अर्थनीती आखण्याची आवश्यक्ता आहे. नवीन वर्षापासून त्याची सुरुवात व्हावी, याचा प्रयत्न स्वदेशी जागरण मंच करीत आहे.
यावेळी अतिथी अरुण ओझा यांच्यासह कश्मिरीलाल, भगवतीप्रकाश शर्मा, एम. कुमार स्वामी, आर. सुन्दरम, जे. जगदीश, लक्ष्मीनारायण भाला, लालजीभाई पटेल, अश्‍विनी महाजन, सरोज मित्रा, सतीश कुमार, भागीरथ चौधरी, डॉ. रणजितसिंह, रेणू पुराणिक, पुरुषोतम हिसारिया व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. अश्‍विनी महाजन
तिसर्‍या दिवशीच्या प्रथम सत्राला संबोधित करताना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अश्‍विनी महाजन यांनी, कृषिक्षेत्रातील गुंतवणूक आणि पेटण्ट यांना व्यापारविषयक चर्चेतून दूर ठेवण्याबाबत सूचवले. याच सत्रात राष्ट्रीय सहसंयोजक लक्ष्मीनारायण भाला यांनी राष्ट्रीय शिक्षण आयोग स्थापन करण्याची मागणी केली. समाजातील सर्व जाती-पंथ, धर्म आणि विविध भाषिक स्त्री-पुरुषांना समान शिक्षण उपलब्ध झाले तरच समरस समाज संघटित तसेच स्वावलंबी बनू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले. शिक्षणाच्या नावावर व्यापार करणारे तसेच विदेशी गुंतवणुकीच्या जोरावर भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर आपला जम बसवणार्‍या व्यक्ती, संघटना यांच्यावर त्यांनी ताशेरे ओढले. शैक्षणिक संस्था शिक्षणाच्या दर्जावरून समाजातील श्रीमंत व गरीब यांच्यात फूट पाडत असल्याचा इशारा भाला यांनी दिला. धार्मिक अल्पसंख्यक असल्याचा लाभ उठवत शिक्षण क्षेत्रात मनमानी करीत नको ते विषय शिकवले जात असल्याने हा सर्व विरोधाभास दूर करण्यासाठी सर्वसमावेशक व सरळसुलभ शिक्षण नीती बनवण्याच्या आवश्यक्तेवर त्यांनी भर दिला.
स्मरणिका, दिग्दर्शिकेचे प्रकाशन
स्वदेशी जागरण मंचाच्या या तीन दिवसीय संमेलनाशी संबंधित ‘स्वदेशी दृष्टी’ नामक स्मरणिकेचे प्रकाशन मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय संपूर्ण भारतातील कार्यकर्त्यांचे पत्ते, मोबाईल क्रमांक असलेली दिग्दर्शिकासुद्धा प्रकाशित करण्यात आली. याच कार्यक्रमात अश्‍विनी दुबे व कुणाल पटेल यांनी तयार केलेल्या संपूर्ण भारतात पार पडलेल्या विविध कार्यक्रम तसेच आंदोलनांशी संबंधित डिजिटल प्रदर्शनाचे लोकार्पण करण्यात आले.
या संमेलनाला प्रांत प्रचारक मुरलीधर, क्षेत्रीय संपर्क प्रमुख जसवंत खत्री, कैलास भंसाली, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. महेश शर्मा, राजकुमार लोहिया, ज्ञानेश्‍वर भाटी, दीपक व्यास यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26335

Posted by on 10:56 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google