richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » भारत झुकणारा देश नाही : सरसंघचालक

भारत झुकणारा देश नाही : सरसंघचालक

►डोकलाम प्रकरणावर प्रतिक्रिया,
अलाहाबाद, ५ सप्टेंबर –
जागतिक पातळीवर भारताची बाजू भक्कम करण्याचे खरे श्रेय नरेंद्र मोदी सरकारलाच जाते, असे स्पष्ट करीत राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण मुद्यावर भारत कधीच कुणापुढे झुकणार नाही, हे अलीकडील डोकलाम वादावरून स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज मंगळवारी येथे केले.
राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित मुद्दा जेव्हा समोर येईल, तेव्हा भारत कुणापुढेही गुडघे टेकणार नाही, ही सत्यता भारताने संपूर्ण जगापुढे समोर आणली आहे, असे सरसंघचालक म्हणाले. अलाहाबादपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडा येथील एका महाविद्यालयाला लालबहादूर शास्त्री यांचे नाव देण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. मोहनजी बोलत होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा वाढविण्यासोबतच नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत अभियानही हाती घेतले आहे. या अभियानाचे मी मनापासून कौतुक करतो, असेही त्यांनी सांगितले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात शास्त्रीजींनी ज्या पद्धतीने जनतेचा पाठिंबा मिळविला होता, तसाच प्रचंड जनाधार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी मिळविला आहे, असेही ते म्हणाले.
मोदी सरकारच्या कणखर धोरणांमुळेच जगात भारताचा मान उंचावला आहे. जगभरातील लोक भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहेत, असे ते म्हणाले.
प्रेरणादायी नेतृत्व काय करू शकते, हे आपण सर्वांनीच बघितले आहे. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी देशवासीयांना सोमवारी उपवास करण्याचे आवाहन केले होते. सर्व देश सोमवारी उपवास करीत होता. आज पुन्हा एकदा सर्व देशवासी देश स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमात डॉ. भागवत यांच्यासोबतच उत्तरप्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह, शास्त्री यांचे चिरंजीव अनिल शास्त्री व सुनील शास्त्री आदी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34902

Posted by on 9:13 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google