Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-बांगलादेश यांच्यात अणुकरार

भारत-बांगलादेश यांच्यात अणुकरार

Indian Prime Minister Narendra Modi, left, and Bangladesh’s Prime Minister Sheikh Hasina shake hands in Dhaka, Bangladesh, Saturday, June 6, 2015. India and Bangladesh on Saturday finalized a much-delayed land swap agreement to settle a long-running border dispute. The deal, initially reached in 1974 but only recently ratified by India's Parliament, calls for the transfer of 111 border enclaves to Bangladesh in exchange for 51 that will become part of India. (AP Photo/A.M. Ahad)नवी दिल्ली, [१५ मे] – शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने बांगलादेशसोबत अणुकरारावर स्वाक्षरी केली असून, दक्षिण आशियात भारताचे उल्लेखनीय यश म्हणून याकडे बघितले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या कराराबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती आणि अखेर दोन्ही देशांनी अणुकराराला एका पॅकेजचे स्वरूप दिले आहे. ही एक सुरुवात असून, दोन्ही देशांना अजून बरेच पुढे जायचे आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले.
पालताना येथून बांगलादेशला १०० मेगावॅट वीजपुरवठा करण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. याचे नूतनीकरण करून ही क्षमता ५०० मेगावॅटपर्यंत वाढविण्यात येणार आहे. याशिवाय पश्‍चिम बंगालमधून डिझेलचा पुरवठा करण्याचे आश्‍वासन भारताने बांगलादेशला दिले आहे.
ईशान्य भारतातील राज्यांना एलपीजी आणि एलएनजीचा अखंडित पुरवठा करण्यासाठी भारताला बांगलादेशातून मार्ग तयार करायचा आहे. या बदल्यात भारताने बांगलादेशला एलपीजी व एलएनजी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ईशान्य भारतातील राज्यांना पॉवर हाऊस करण्याची भारताची योजना असून, त्यासाठीच्या ट्रान्समिशन लाईन बांगलादेशातून जाणार आहे. यासाठी बांगलादेशला ऊर्जा क्षेत्रात भागीदार बनविण्याची तयारी भारताने दर्शविली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28261

Posted by on May 16 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (346 of 2477 articles)


=अमित शाह यांचा आरोप= दाहोद, [१५ मे] - कॉंगे्रसप्रणीत संपुआने आपल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात देशाची तिजोरी पूर्णपणे रिकामी केली. तिजोरीत ...

×