Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » भारत-सिंगापूरमध्ये दहा करार

भारत-सिंगापूरमध्ये दहा करार

modi with singapu President Tony Tan Keng Yam.सिंगापूर, [२४ नोव्हेंबर] – द्विपक्षीय संबंधाला नवी उंची प्रदान करताना भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये दहा करार करण्यात आले आहेत. संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, सायबर सुरक्षा, जहाजबांधणी आणि हवाई उड्डाण क्षेत्रातील करारांचा यात समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली हसीएन लूंग यांच्यात झालेल्या चर्चेची ही फलश्रुती आहे.
आपल्या दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी मोदी यांनी सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष टोनी टॅन केंग यांची भेट घेतली. इस्ताना येथे मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. दौर्‍यात दहा करार करण्यात आले असून, दोन पंतप्रधानांच्या संयुक्त घोषणापत्रकातील धोरणात्मक भागीदारीचाही यात समावेश आहे. द्विपक्षीय संबंधाला नवी दिशा प्रदान करण्याच्या उद्देशाने सध्या असलेल्या सहकार्याच्या क्षेत्राव्यतिरिक्त राजकीय, संरक्षण, आर्थिक आणि सांस्कृतिक या क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. धोरणात्मक भागीदारीमुळे या भागात स्थैर्य राखण्यास आणि विकासाच्या बाबतीतही बरीच मदत मिळणार आहे. दोन राष्ट्रातील संरक्षण मंत्र्यांमध्ये संवाद, लष्कराचा संयुक्त अभ्यास, संरक्षण उद्योगात सहकार्य या विषयावरील इतर करारांचीही यात समावेश आहे. सायबर सुरक्षा संस्थांना परस्पर सहकार्य करणे आणि इतर सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले आहेत. सायबर हल्ला प्रकरणी माहितीची आदानप्रदान, आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन सहकार्य ,सायबर सुरक्षेसंदर्भातील योजना आणि व्यावसायिक आदानप्रदान यावरही सामंजस्य करारात भर देण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25703

Posted by on Nov 24 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1170 of 2483 articles)


=प्रवीण तोगडिया यांचे आवाहन= अहमदाबाद, [२४ नोव्हेंबर] - रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि जगभरात हिंदूंना संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका पार ...

×