Home » छायादालन, मुंबई-कोकण » मनोज कुमार रूग्णालयात दाखल

मनोज कुमार रूग्णालयात दाखल

manoj-kumar1मुंबई, [३ डिसेंबर] – ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना अंधेरीच्या कोकिलाबेन रूग्णालयात दाखल केलं आहे. काल बुधवारी त्यांची प्रकृती खालावली होती. आता मात्र त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.
७८ वर्षीय मनोज कुमार यांना देशभक्तीच्या भूमिकांसाठी ओळखलं जात असून त्यांना ‘भारत कुमार’ असंही म्हटलं जातं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन रूग्णालयात दाखल केले. गेल्या १५ दिवसांपासून ते रूग्णालयात असून त्यांच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होऊ लागली. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिक काही बोलण्यास रूग्णालय प्रशासनाने नकार दिला आहे.
मनोज कुमार यांनी अनेक चित्रपटात काम केले असून ‘पूरब और पश्‍चिम, क्रांती, शहीद, उपकार, वह कौन थी? हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25938

Posted by on Dec 3 2015. Filed under छायादालन, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, मुंबई-कोकण (204 of 424 articles)


=४५ अब्ज रुपये दान करणार= सॅनफ्रॅन्सिस्को, [२ डिसेंबर] - फेसबुक या जगातील आघाडीच्या सोशल नेटवर्किंग साईटचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना ...

×