Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न

मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न

=४५ अब्ज रुपये दान करणार=
Mark Zuckerberg with wife daughterसॅनफ्रॅन्सिस्को, [२ डिसेंबर] – फेसबुक या जगातील आघाडीच्या सोशल नेटवर्किंग साईटचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. झुकेरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनने गेल्या आठवड्यात गोंडस मुलीला जन्म दिला.
या दाम्पत्याची ही पहिलीच मुलगी आहे. यामुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुलीच्या जन्मानंतर आपल्या नावावर असलेले फेसबुकचे ९९ टक्के शेअर्स दान करण्याचे त्यांनी ठरविले असून, त्याची किंमत ४५ अब्ज रुपये इतकी आहे. तिच्या जन्मानंतर दोन महिन्यांची रजा घेण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
मानवता आणि समानतेसाठी काम करणार्‍या ‘ड्युरिंग अव्हर लाईव्हज’ या संस्थेला ही रक्कम दान देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे दाम्पत्य नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी करीत होते. मातापिता होण्याचे दोघांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झाले आहे. मुलीचे नाव मॅक्स असे ठेवण्यात आले असून, या संदर्भातील माहिती मार्कने तिघांचा फोटो फेसबुकवर टाकून शेअर केली आहे.
मुलीला एक सुरेख पत्र लिहून मार्कने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘भविष्यात जगण्यासाठी आम्हा दोघांना तू नवी उमेद दिली आहे. भावना व्यक्त करण्यासाठी आमचे शब्दही अपुरे पडत आहेत. सुखी, आनंदी आणि सुदृढ आयुष्य घालविण्यासाठी तू आयुष्याचा वेध घेशील, अशी आम्हाला आशा आहे. तुझ्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचे काम तू मला आणि प्रिसिलाला दिलेच आहे’ या शब्दात मार्कने आपला आनंद व्यक्त केला आहे. रक्कम दान करण्याच्या मार्कच्या निर्णयाची मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्‌स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी स्तुती केली आहे. तुमचे उदाहरण आम्ही आणि जगातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25933

Posted by on Dec 3 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1106 of 2483 articles)


=लोकसभेत कॉंग्रेस सदस्यांचा गदारोळ= नवी दिल्ली, [२ डिसेंबर] - परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवरून आज लोकसभेत ...

×