richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » मिरवाईजच्या समर्थकांनीच केली अयुब यांची हत्या

मिरवाईजच्या समर्थकांनीच केली अयुब यांची हत्या

=समोर आले धक्कादायक सत्य
श्रीनगर, २४ जून – नौहाटा येथील जामिया मशिदीच्या परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडित यांची संतप्त जमाव दगडाने ठेचून हत्या करीत असताना, फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूख हा त्यावेळी मशिदीतच होता आणि त्याचे समर्थक बाहेर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत होते, अशी धक्कादायक सत्यता आता समोर आली आहे.
घटनेच्या वेळी पंडित साध्या गणवेशात होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते याच भागात ड्युटीवर असल्याने त्यांना परिसरातील बहुतेक सर्वच लोक ओळखत होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास या मशिदीत रमझाननिमित्त विशेष प्रार्थना सुरू होती. यात मिरवाईज हादेखील सहभागी होता आणि त्याचे शेकडो समर्थक बाहेर पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देत होते. हा सर्व प्रकार मोहम्मद अयुब आपल्या कॅमेरात टिपत असताना मिरवाईजच्या समर्थकांनी, तो रॉ किंवा भारतीय गुप्तचर यंत्रणेचा सदस्य असावा, असा समज करून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे कपडे फाडले आणि दगडांनी ठेचून त्यांना ठार मारले. या सर्व घटनेची माहिती मशिदीत असलेल्या मिरवाईजला होती. पण, त्याने समर्थकांना अडविले नव्हते, असे या भीषण घटनेची चौकशी करीत असलेल्या पोलिस अधिकार्‍याने सांगितले.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या मते, पंडित यांचा जीव जाईपर्यंत लोक त्यांना मारत होते. त्यांना इतक्या निर्दयपणे मारण्यात आले की, त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करणेही कठीण झाले होते. आयुब यांचा मुलगा तर वडिलांचा मृतदेह पाहताच बेशुद्ध पडला होता. त्यांची मुलगी सानिया बांगलादेशात शिक्षण घेते. ईद साजरी करण्यासाठी ती काश्मीरमधील आपल्या घरी आली होती. मात्र, तिला वडिलांचे अंत्यसंस्कार पाहावे लागले.
आणखी तिघांना अटक
या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आज आणखी तिघांना अटक केली आहे. पोलिस महासंचालक एस. पी. वेद यांनी सांगितले की, या प्रकरणात सहभागी असलेल्या एकूण १२ जणांची ओळख पटविण्यात आली असून, आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात सहभागी असणार्‍यांची मुळीच गय केली जाणार नाही.

Short URL: http://vrittabharati.in/?p=34810

Posted by on 1:27 am. Filed under छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google