Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » रणोत्सवात ‘पाक’ बॉर्डरजवळ राहणार पंतप्रधान मोदी

रणोत्सवात ‘पाक’ बॉर्डरजवळ राहणार पंतप्रधान मोदी

MODI in Rann Utsav-2012कच्छ, [९ डिसेंबर] – गुजरातमधील कच्छमध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘रणोत्सव’ १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ‘रणोत्सव’ हा जगातील सर्वात मोठा उत्सव असून तो १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या रणोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ डिसेंबरपासून सहभागी होणार असून पाकिस्तानी बॉर्डर जवळ ते तीन दिवस तंबूत राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी डीजीपी मीटिंग दरम्यान तीन दिवस मेकशिफ्ट टेंट म्हणजे तंबूत राहणार आहे. कच्छमधील रणपासून पाकिस्तानी बॉर्डर खूपच जवळ असल्यामुळे या भागात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. तसेच रणोत्सवादरम्यान हा परिसर ‘नो फ्लाय झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. आकाशात काही संशयास्पद दिसल्यास त्याच्यावर निशाणा साधला जाणार आहे. ‘एंटी एअरक्राफ्ट गन्स’ तैनात करण्यात येणार आहे. यादरम्यान ड्रोनचाही वापर करण्यात येणार नाही. दरम्यान, , डीजीपी मीटिंगच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देणार आहे. अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26066

Posted by on Dec 9 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1056 of 2477 articles)


=काळा पैसा : यादीत चौथ्या स्थानी, अमेरिकन थिंक टँकचा अहवाल= वॉशिंग्टन, [९ डिसेंबर] - परदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा हा ...

×