richwood
richwood
richwood
Home » छायादालन, राष्ट्रीय, संरक्षण » रासायनिक हल्ल्याच्या सामन्यासाठी सज्ज राहावे

रासायनिक हल्ल्याच्या सामन्यासाठी सज्ज राहावे

=अफगाण सीमेवर वापर: मनोहर पर्रीकर यांचा इशारा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २ मार्च –
अफगाणिस्तानच्या सीमेवर रासायनिक शस्त्रांचा वापर होत आहे, अशी धक्कादायक माहिती देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज गुरुवारी येथे दिली. हा सारा घटनाक्रम बघता, आपण आण्विक वा रासायनिक हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी नेहमी सज्ज राहायला हवे, असा सावधगिरीचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
उल्लेखनीय म्हणजे, मागील काही दिवसांपासून पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. शहबाज कलंदर दर्ग्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने शेकडो दहशतवाद्यांना ठार केले आहे. या सार्‍या पृष्ठभूमीवर पर्रीकर यांनी हा सावधगिरीचा इशारा दिला आहे, हे येथे उल्लेखनीय!
दिल्ली येथे डीआरडीओतर्फे आयोजित कार्यक्रमात पर्रीकर म्हणाले, अफगाणिस्तानातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तेथील फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत असून, येथील नागरिकांच्या अंगावर पुरळ उठल्याचे दिसून येत आहे, असे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
लष्कर भर्तीमधील पेपर फुटीबाबत विचारले असता, याबाबत पर्रीकर म्हणाले, सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, मंत्रालयाने सोमवारीच एसआयटी चौकशीची शिफारस केली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=34773

Posted by on 10:03 pm. Filed under छायादालन, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google