richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, राजस्थान, राज्य » लव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती

लव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती

=राजस्थान सरकारचा पुढाकार,
जयपूर, १९ नोव्हेंबर – संपूर्ण देशात लव्ह जिहादची प्रकरणे वाढत असल्याने तसेच हिंदू युवती व विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार होत असल्याने याला अटकाव करण्यासाठी राजस्थान सरकारने पुढाकार घेतला आहे.
राजस्थानमधील शाळांना सध्या सरकारकडून विद्यार्थी आणि शिक्षकांना जत्रेला पाठविण्यास सांगितले जात आहे. या जत्रेत विद्यार्थ्यांना लव्ह जिहाद, धर्मांतरासाठी ख्रिश्‍चनांकडून करण्यात येणारी कारस्थाने यासंबंधी माहिती पुरवली जात असल्याची माहिती आहे.
जयपूरचे अतिरिक्त जिल्हा शिक्षण अधिकारी दीपक शुक्ला यांनी सरकारी व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारने जत्रेत पाठवायला सांगितल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जत्रेच्या आयोजकांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना तेथे नेण्याचे आदेश प्राथमिक आणि माध्यमिक मंत्री वासुदेव देवनानी यांनीच दिल्याचे त्यांनी म्हटले. हिंदू स्पिरिच्युअल ऍण्ड सर्व्हिस फेअर (एचएसएसएफ) ही संस्था या जत्रेसाठी स्वत:हून सरकारी आणि खाजगी शाळांशी संपर्क साधते. मात्र, सरकारी शाळांमध्ये गेल्यानंतर सरकारच्या परवानगीचे कारण सांगून विद्यार्थ्यांना जत्रेला पाठवण्याबद्दल असमर्थता व्यक्त केली जाते. त्यामुळेच शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना जत्रेला नेण्याचे निर्देश दिल्याचे शुक्ला यांनी सांगितले. मात्र, या संदर्भात प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला. जत्रेला साधारण २१०० शिक्षकांनी हजेरी लावावी, असे आयोजकांना वाटते. त्यामुळे आम्ही शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेतील दोन ते तीन शिक्षकांनाही जत्रेला जाण्यास सांगितले, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले.
एचएसएसएफने जयपूरमध्ये या पाच दिवसीय जत्रेचे आयोजन केले आहे. २० नोव्हेंबरला ही जत्रा संपत असून एचएसएसएफने जयपूरमध्ये जत्रा आयोजित करण्याची ही तिसरी वेळ आहे. समाजोपयोगी उपक्रमांना प्रेरणा देणार्‍या संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही जत्रा आयोजित केल्याचे आयोजकांनी सांगितले. या जत्रेत विश्‍व हिंदू परिषदेकडून स्टॉल लावण्यात आला आहे. या ठिकाणी येणार्‍या विद्यार्थ्यांना बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि आमिर खान यांच्याबद्दल सांगितले जात आहे. सैफ अली खान आणि आमिर खान यांनी आपल्या हिंदू पत्नींशी घटस्फोट घेतला. त्यानंतर पुन्हा नव्या हिंदू महिलांना जाळ्यात अडकवले. दबावाखाली येऊन दुसरा धर्म स्वीकारण्यापेक्षा आपल्याच धर्मात असताना मरण पत्करणे श्रेयस्कर असते, असा संदेश असलेली पत्रके या ठिकाणी वाटली जात आहेत. तसेच ब्युटी पार्लर्स, मोबाईल रिचार्जची दुकाने, लेडीज टेलरची दुकाने, मुस्लिम विक्रेते अशा ठिकाणी लव्ह जिहादला बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी, असेही या पत्रकांमध्ये म्हटले आहे.
तर जत्रेत वाटण्यात आलेल्या आणखी एका पत्रकामध्ये ख्रिश्‍चन मिशनर्‍यांकडून धर्मांतरासाठी अवलंबिल्या जाणार्‍या वादग्रस्त प्रकारांचा उल्लेख आहे. नागालॅण्ड आणि अरुणचाल प्रदेशात तीन लाख प्रचारक ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार करत आहेत. त्यांना युरोप आणि अमेरिकेतून अर्थसाह्य पुरवले जाते, तर देशात मुस्लिम प्रचारकांची संख्या पाच लाख इतकी आहे. याशिवाय, देशात २५० दहशतवादी केंद्रे आहेत, असा उल्लेेखही पत्रकांमध्ये आहे.
याशिवाय, भारतीय हिंदू सेनेच्या स्टॉलवर भारताला संपूर्ण हिंदू राष्ट्र करण्याच्या आणि अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना एकनिष्ठतेची शपथ घेण्यास सांगितले जात आहे. बाबा जयगुरू धर्म विकास संस्थानकडून विद्यार्थ्यांना शाकाहाराची शपथ घेण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. आम्ही संपूर्ण देशभरात ३१ दिवसांची मोहीम राबवणार आहोत. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश या प्रमुख राज्यांच्या समावेश असल्याची माहिती एचएसएसएफचे प्रचार मंत्री पुष्पेंद्र सिंह यांनी दिली.

Short URL: http://vrittabharati.in/?p=35020

Posted by on 1:25 am. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजस्थान, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google