richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » वागणे सुधारा, अन्यथा पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’

वागणे सुधारा, अन्यथा पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’

►भारतीय लष्कराचा पाकला इशारा,
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –
नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरी आणि गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढत असतानाच, पाकने आपल्या वागणे सुधारले नाही, तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल, असा सज्जड इशारा भारतीय लष्कराच्या उत्तर मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडर इन्चार्ज लेफ्टनंट जनरल देवराज अनबू यांनी दिला.
नियंत्रण रेषेवर पाकच्या सैनिकांनी आपल्या कारवाया नियंत्रणातच ठेवाव्या. कारण, आम्ही ही सीमा पुन्हा एकदा पार केली, तर पूर्वीपेक्षा मोठे नुकसान पाकला सहन करावे लागेल. यावेळची आमची कारवाईदेखील कठोर राहील, असे त्यंानी सांगितले.
काश्मीर खोर्‍यात दहशतवादी कारवाया आणि तरुणांना दगडफेक करण्यास प्रोत्साहित करण्याकरिता सीमेपलीकडूनच पैसे मिळत असल्याचे एनआयएच्या चौकशीत सिद्ध झाले आहे.
एनआयएने फुटीरतावादी नेत्यांना जेरबंद करून, व्यापक धाडी घातल्यामुळे खोर्‍यातील दगडफेकीच्या घटनांमध्ये बरीच घट झाली आहे, असा दावाही त्यांनी पत्रपरिषदेत बोलताना केला.
गुलाम काश्मिरात गेल्या एक वर्षाच्या काळात दहशतवादी शिबिरे वाढली असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. पीर पंजालच्या दक्षिण आणि उत्तरेला मोठ्या प्रमाणात दहशतवादी शिबिरे वाढली आहेत, असे सांगतनाना ते म्हणाले की, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सीमा पार करून सर्जिकल स्ट्राईक करणार्‍या आठ जवानांना आज गुरुवारी लष्कराच्या उत्तर मुख्यालयात शौर्य चक्र आणि सेना पदक देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. (वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34912

Posted by on 11:07 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google