Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » विवेकानंद म्हणजे भारताचा आत्मा

विवेकानंद म्हणजे भारताचा आत्मा

  • ‘एक आशिया’ची संकल्पना स्वामींचीच
  • पंतप्रधानांचे प्रतिपादन
  • मलेशियात विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण

modi inaugurating Swami Vivekananda statueक्वालालाम्पूर, [२२ नोव्हेंबर] – स्वामी विवेकानंद हे कुण्या एका व्यक्तीचे नाव नाही, किंवा व्यवस्थेची ओळखही नाही. तर, एक हजार वर्षे जुन्या भारतीय संस्कृतीचे ते प्रतीक आहेत. विवेकानंद हे भारताचा आत्मा आहेत. आज ज्या अखंड आशियाबाबत आपण बोलत आहोत, ती संकल्पना फार पूर्वी स्वामी विवेकानंद यांनीच मांडली होती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केले.
मलेशियाची राजधानी क्वालालाम्पूर येथील रामकृष्ण मिशन येथे स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करीत होते. विवेकानंदांच्या कांस्य पुतळ्याचे मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले, तेव्हा दोन हजारांवर भारतीयांनी ‘मोदी, मोदी’ असे नारे दिले. विशेष म्हणजे, क्वालालाम्पूर येथे मुसळधार पाऊस पडत असतानाही मोदी यांच्या भेटीसाठी येथील भारतीयांचा उत्साह जबरदस्त होता. हा पुतळा भारतातील बेलूर मठातर्फे मलेशियातील रामकृष्ण मिशनला भेट म्हणून दिला आहे. मिशनचे प्रमुख स्वामी सुप्रियानंद यांनी मोदी यांचे स्वागत केले. यावेळी योगावरील पुस्तकाचेही मोदी यांनी विमोचन केले.
बहुतांश तामिळ नागरिकांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमात हिंदीतून बोलताना पंतप्रधान म्हणाले की, केवळ विवेकानंदांच्या पुतळ्याचे लोकार्पण करून चालणार नाही, तर त्यांना हृदयात वसविण्याची गरज आहे. वेदापासून तर विवेकानंद यांच्यापर्यंत भारतीय संस्कृती जगात समृद्धच राहिली आहे. त्यांच्या विचारांमुळेच भारत उपनिषदांपासून उपग्रहांपर्यंत वाटचाल करू शकला आहे, असे सांगताना मोदी यांनी विवेकानंदांच्या आयुष्याशी संबंधित एक किस्साही सांगितला. तरुण मुले जेव्हा त्यांना, ईश्‍वरप्राप्तीसाठी काय करायला हवे, असे विचारत होते, तेव्हा ‘जा आणि फुटबॉल खेळा’ असा सल्ला विवेकानंद त्यांना द्यायचे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. जनसेवा हीच खरी प्रभूसेवा आहे, यावर त्यांचा गाढ विश्‍वास होता. संपूर्ण जगापुढे वातावरणातील बदल आणि दहशतवाद या दोनच मुख्य समस्या आहेत आणि त्या हाताळण्यासाठी सत्याचा मार्ग आवश्यक आहे. जेव्हा आपसातील संघर्ष संपेल, तेव्हाच दहशतवादाचाही अंत होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25660

Posted by on Nov 23 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1185 of 2483 articles)


=पाकला झाली उपरती= इस्लामाबाद, [२२ नोव्हेंबर] - पाकिस्तान-अफगाण सीमेवरील आदिवासी भागात विशेषत: वायव्य सरहद्दीतील बलुचिस्तानात सुरू असलेल्या अतिरेकी कारावायांमागे भारतीय ...

×